SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठात शिवराज्याभिषेक दिनविकसित कृषी संकल्प अभियान अंतर्गत गडहिंग्लज तालुक्यातील शेतकऱ्यांना मार्गदर्शन समृद्धी महामार्ग वाढवण बंदराशी जोडणार;हा महामार्ग राज्याच्या समृद्धीचा कॉरिडॉर ठरेल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूर महापालिकेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पर्यावरण जनजागृती रॅली जागतिक पर्यावरण दिनाच्या निमित्ताने भाजपाच्या वतीने वृक्षारोपण आणि संवर्धनशिवराज्याभिषेक दिनानिमित्त आप तर्फे रक्तदान शिबिराचे आयोजन; शिबिरात सहभागी होण्याचे आवाहन पीक विविधतेतून उत्पन्नवाढ शक्य : डॉ. गणेश कदम: डी. वाय. पाटील एज्युकेशन सोसायटीच्या कृषी विज्ञान केंद्रामार्फत शेतकऱ्यांना मार्गदर्शनशिवाजी विद्यापीठात पर्यावरण दिनानिमित्त वृक्षारोपणस्वच्छता आणि पर्यावरणपूरक उपक्रमामुळे कोल्हापूर औद्योगिक क्षेत्रात 'क्लीन अँड ग्रीन'चा आदर्श : जिल्हाधिकारी अमोल येडगेमहिला संरक्षणाला विशेष प्राधान्य, अपर पोलिस अधीक्षक धिरजकुमार बच्चू यांचे प्रतिपादन

जाहिरात

 

सैनिकी मुला, मुलींच्या वसतीगृहात कंत्राटी पध्दतीने पद भरती

schedule04 Jun 25 person by visibility 246 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय यांच्या अखत्यारित असलेल्या सैनिक मुला व मुलींचे वसतीगृह, कोल्हापूर, सैनिकी मुलांचे वसतिगृह, पन्हाळा आणि सैनिक आरामगृह कोल्हापूरसाठी अशासकीय पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात कंत्राटी पध्दतीने व एकत्रित मानधनावर भरण्यात येणार आहेत. माजी सैनिकांना प्रथम प्राधान्य देण्यात येणार असून इच्छुकांनी आपले अर्ज दिनांक 16 जून 2025 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे जमा करावेत. अर्जाचा नमुना जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात उपलब्ध असून विहीत नमुन्यातच अर्ज सादर करावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी ले. कर्नल डॉ. भिमसेन चवदार (निवृत्त) यांनी केले आहे.

     सैनिकी मुलांचे वसतिगृह, कोल्हापूरसाठी सहायक वसतिगृह अधिक्षक /सुरक्षा सुपरवायझर एंव सहायक व्यवस्थापक-2/ लिपीक - पदांची संख्या 2 (पुरुष), एकत्रित मानधन- 24 हजार 477 रुपये.

स्वयंपाकी- पदांची संख्या 5 (महिला), एकत्रित मानधन- 13 हजार 924 रुपये

 सफाई कर्मचारी - पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन- 13 हजार 89 रुपये

 पहारेकरी पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन-  20 हजार 886 रुपये.

       सैनिकी मुलींचे वसतिगृह, कोल्हापूरसाठी वसतिगृह अधिक्षका -पदाची संख्या 1 (महिला), एकत्रित मानधन- 31 हजार 365 रुपये

वसतिगृह सहायक अधिक्षका- पदांची संख्या 3 (महिला), एकत्रित मानधन- 24 हजार 477 रुपये

 पहारेकरी- पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन 20 हजार 886 रुपये

 स्वयंपाकी- पदांची संख्या 6 (महिला), एकत्रित मानधन- 13 हजार 924 रुपये

 सफाई कर्मचारी- पदाची संख्या 1 (महिला), एकत्रित मानधन- 13 हजार 89 रुपये

 माळी - पदाची संख्या 1 (महिला/पुरुष), एकत्रित मानधन- 13 हजार 89 रुपये

        सैनिक मुलांचे वसतिगृह, पन्हाळासाठी पदाचे नाव -वसतिगृह अधिक्षक/ अशासकीय सहायक व्यवस्थापक -पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन- 31 हजार 365 रुपये

पहारेकरी- पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन - 20 हजार 886 रुपये

       सैनिक आरामगृह, कोल्हापूरसाठी सफाई कर्मचारी- पदाची संख्या 1 (पुरुष), एकत्रित मानधन -13 हजार 89 रुपये इत्यादी रिक्त पदे आहेत.        

        प्राप्त अर्जांची पडताळणी करुन पात्र उमेदवारांना मुलाखतीसाठी मोबाईलद्वारे कळविण्यात येईल. उमेदवार निवडीचे सर्व अधिकार जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, कोल्हापूर यांना राहतील. इतर अटी, शर्ती व सविस्तर माहितीसाठी जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, कोल्हापूर येथे किंवा मोबाईल क्रमांक 9172035612 व दुरध्वनी क्रमांक 0231-2665812 वर संपर्क साधावा.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes