SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजनसेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाणविमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्जडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवडराजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासूनदावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनभारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतक

जाहिरात

 

विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule08 Feb 26 person by visibility 104 categoryराज्य

🔸ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकामासह विस्तारीकरणाचे भूमिपूजन

नाशिक : विमान प्रवास आता चैनीची नव्हे, तर आवश्यक गरज झाली आहे.  विमानतळाच्या विस्तारीकरणामुळे नाशिकच्या सर्वांगीण विकासाला चालना मिळणार आहे. त्यामुळे नाशिक जिल्हा औद्योगिक विकासात भरारी घेईल, असा विश्वास राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

महाराष्ट्र पायाभूत सुविधा विकास महामंडळ मर्यादित ओझर विमानतळ नवीन एकात्मिक टर्मिनल इमारतीचे बांधकाम व विस्तारीकरणाचे भूमिपूजन आज सायंकाळी ओझर विमानतळ येथे मुख्यमंत्री  फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. 

यावेळी कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन, शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंह भोसले, अन्न व औषध प्रशासन, विशेष साहाय्य मंत्री नरहरी झिरवाळ, खासदार भास्कर भगरे, खासदार राजाभाऊ वाजे, आमदार सीमा हिरे, आमदार दिलीप बनकर, आमदार सरोज अहिरे, आमदार नितीन पवार, महापौर हिमगौरी आडके, उपमहापौर विलास शिंदे, विभागीय आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम, विशेष पोलिस महानिरीक्षक दत्तात्रय कराळे, कुंभमेळा आयुक्त शेखर सिंह, महानगरपालिका आयुक्त मनीषा खत्री, महाराष्ट्र राज्य पायाभूत सुविधा विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक ब्रिजेश दीक्षित, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, हिंदुस्थान एरोनॉटिक्सचे मुख्य कार्यकारी अधिकारी साकेत चतुर्वेदी, जानोरीचे सरपंच सुभाष नेहरे आदी उपस्थित होते.

यावेळी जिल्हाधिकारी श्री. प्रसाद आणि एचएएलचे संजय चौधरी यांनी सामंजस्य कराराचे आदान प्रदान केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes