SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाकडून ‘वंदे मातरम् सायक्लोथॉन २०२६’ चे आयोजनसेशेल्स प्रजासत्ताकचे महामहिम आणि प्रथम महिला यांचे दिल्लीकडे प्रयाणविमानतळाच्या विस्तारीकरणामुळे औद्योगिक विकासात नाशिक घेणार भरारी : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीससमर्पणाच्या भावनेतून ‘अनुलोम’चे काम : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसडी वाय पाटील प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे पृथ्वीराज पाटील यांच्या हस्ते उद्घाटनकोल्हापूर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक निकाल: उद्या मतमोजणी; प्रशासन आणि पोलीस यंत्रणा सज्जडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या १३ विद्यार्थ्यांची आयआयटी व एनआयटीमध्ये इंटर्नशिपसाठी निवडराजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासूनदावोस कराराद्वारे अहिल्यानगरमध्ये १२ हजार कोटींची गुंतवणूक ; १८ हजार रोजगार निर्मिती : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, तौरल इंडियाच्या सुपा प्रकल्पाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटनभारताकडून अमेरिकेचा २९ धावांनी पराभव; सिराजने घेतले ३ विकेट, सूर्याचे अर्धशतक

जाहिरात

 

राजर्षी शाहू संगीत रजनी १० फेब्रुवारीपासून

schedule08 Feb 26 person by visibility 132 categoryसामाजिक

कोल्हापूर: शिवाजी विद्यापीठाच्या संगीत व नाट्यशास्त्र  अधिविभागातर्फे आयोजित करण्यात येणारी राजर्षी शाहू संगीत रजनी यंदा येत्या दि. 10 व 11 फेब्रुवारी २०२६ रोजी पेटाळा (कोल्हापूर) येथील राम गणेश गडकरी सभागृहामध्ये होत आहे.

२८ जानेवारी राज्याचे उपमुख्यमंत्री मा. अजितदादा पवार यांचे अपघाती निधन झाल्यामुळे २९ व ३० जानेवारी रोजी आयोजित सदर राजर्षी शाहू संगीत रजनी स्थगित करण्यात आली होती. 

ही दोन  दिवसीय संगीत रजनी दररोज संध्याकाळी ५:३० वाजता सुरू होईल. संगीत रजनीचे उद्घाटन शिवाजी विद्यापीठाचे प्रभारी  कुलगुरू प्रा.डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार असून या प्रसंगी शिवाजी  विद्यापीठाच्या  प्र–कुलगुरू प्रा. डॉ. ज्योती जाधव आणि  कुलसचिव डॉ. विलास शिंदे यांची प्रमुख उपस्थिती असेल . 

 संगीत रजनीमध्ये पहिल्या दिवशी पहिल्या सत्रामध्ये मौशमी जाजू , पुणे यांचे कथ्थक नृत्य होणार आहे, तर दुसर्‍या सत्रामध्येअतुल खांडेकर,पुणे यांचे शास्त्रीय गायन होणार आहे.

दुसर्‍या दिवशीच्या पहिल्या सत्रात डॉ. सुधांशु कुलकर्णी व सारंग कुलकर्णी, बेळगाव यांच्या हार्मोनियम (संवादिनी) वादनाची जुगलबंदी होणार आहे. तर, दुसर्‍या सत्रामध्ये पं. विजय कोपरकर, पुणे यांच्या शास्त्रीय गायनाने राजर्षी शाहू संगीत रजनीची सांगता होणार आहे. 

या सर्व कार्यक्रमांना  आशय कुलकर्णी (तबला), शुभम खंडाळकर (गायन), ज्ञानेश्वर अंडील (पखवाज आणि पढंत), यशवंत थिटे (हार्मोनियम), प्रदीप कुलकर्णी(तबला), गिरीधर कुलकर्णी (तबला), महेश देसाई (तबला), सारंग कुलकर्णी (हार्मोनियम) व स्वरुप दिवाण (हार्मोनियम) यांची साथसंगत लाभणार आहे.

 रसिकांनी आवर्जून उपस्थित राहून संगीत रजनीचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन संगीत व नाट्यशास्त्र अधिविभागाचे प्रमुख डॉ. विनोद ठाकूरदेसाई यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes