सतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा
schedule06 Jul 26 person by visibility 179 categoryराज्य
कोल्हापूर : गगनबावडा तालुक्यातील वेसरफ लघु पाटबंधारे तलाव पूर्ण क्षमतेने भरला असून, आज (दि. ६ जुलै २०२६) सकाळी ११:३० वाजता तलाव १०० टक्के भरल्याची नोंद पाटबंधारे विभागाने केली आहे.
तलावातून होणाऱ्या विसर्गामुळे रूपनी व कुंभी नदीच्या पाणीपातळीत वाढ होण्याची शक्यता आहे.
त्यामुळे, या नद्यांच्या काठावर राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे, असे आवाहन कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर) यांच्या वतीने करण्यात आले आहे.
वेसरफ धरण क्षेत्र हे 'निषिद्ध क्षेत्र' म्हणून घोषित करण्यात आले आहे. सुरक्षेच्या कारणास्तव पर्यटकांना या क्षेत्रात प्रवेश करण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे.