SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांच्या विचारांचा वारसा मोदी सरकारने पुढे नेला; राष्ट्रहितासाठी प्रत्येक कार्यकर्त्याने सज्ज व्हावे : किरीट सोमय्या‘गोकुळ’ मध्ये सहकार सप्ताह उत्साहात साजराडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकला 'एक्सलंट' श्रेणीजन्म-मृत्युचे दाखले वितरणात दक्षता बाळगा माजी खासदार किरीट सोमय्या यांच्या सूचनागोकुळ निवडणूकीसाठी सर्वोच्च न्यायालयाच्या अवमानाप्रकरणी ९१ व्या दिवशी याचिका दाखल करणारसंवाद कौशल्य हीच प्रभावी प्रशासनाची गुरुकिल्ली : डॉ. आलोक जत्राटकररेड अलर्ट असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत; सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल कोल्हापूर: ॲड. विवेकानंद घाटगे यांचा ८ जुलै रोजी ग्रंथतुला करून जाहीर सत्कारकोल्हापूर: बंद घराचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरट्यास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ठोकल्या बेड्या; २.२० लाखांचा मुद्देमाल हस्तगतसतर्कतेचा इशारा: गगनबावडा तालुक्यातील 'वेसरफ' तलाव १००% भरला; नदीकाठच्या गावांना सावधानतेचा इशारा

जाहिरात

 

रेड अलर्ट असतानाही प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत; सतेज पाटील यांचा विधिमंडळात सवाल

schedule06 Jul 26 person by visibility 148 categoryराज्य

कोल्हापूर : मुंबई-पुणे महामार्गावर दरवर्षी दरड कोसळते. हवामान विभागाने रेड अलर्ट जाहीर केला असतानाही सरकारने प्रतिबंधात्मक उपाययोजना का केल्या नाहीत? असा सवाल काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी विधिमंडळात उपस्थित केला. 

आमदार पाटील म्हणाले, पहिल्याच पावसाने सरकारच्या नियोजनशून्य कारभाराचे अपयश समोर आले. हे सरकार नागरिकांच्या जीवाशी खेळत आहे. मुंबईत अपूर्ण झाडछाटणीमुळे झाडे कोसळून नागरिकांचा जीव जात आहे. टाळता येण्याजोग्या दुर्घटना का रोखल्या गेल्या नाहीत? सरकारने स्वत:च अपयश मान्य करून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी धोरण जाहीर करावे अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

 मानखुर्द येथील अनधिकृत इमारत दुर्घटनेतील दोषींवर कारवाई कधी होणार, असा सवालही त्यांनी केला.

मुंबईत दररोज १ कोटी ५ लाख नागरिक प्रवास करतात. मान्सूनची परिस्थिती लक्षात घेता नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी सरकारने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणीही आमदार पाटील यांनी केली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes