SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध आरोग्य उपक्रमबाप्पांचे विसर्जन, अन् मार्गावर ३० टन कचऱ्याचा डोंगर; कोल्हापूर महापालिकेने अवघ्या काही तासांत परिसर केला चकाचक!कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू; जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलतीडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातमातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा; कोल्हापुरातून १५ हजार बांधव होणार सहभागीराज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागूज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या गीतांनी जिंकली कोल्हापूरकरांची मनेगणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचा पर्यावरणस्नेही विक्रम! इराणी खणात तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे विसर्जन; प्रशासनाची २५ तासांहून अधिक अविरत सेवाजागतिक कर्णबधिर दिन: समाजाची जबाबदारी आणि समावेशकता

जाहिरात

 

सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध आरोग्य उपक्रम

schedule26 Sep 26 person by visibility 189 categoryराज्य

कोल्हापूर : सेवा संकल्प अभियानांतर्गत राष्ट्रीय आयुष अभियान, सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हा शल्य चिकित्सक व जिल्हा आरोग्य अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर या कालावधीत जिल्ह्यातील आयुष्मान आरोग्य मंदिर, आयुष, उपजिल्हा रुग्णालये व ग्रामीण रुग्णालयांमध्ये विविध आयुर्वेदिक आरोग्य शिबिरे, योग, ध्यान व जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येत आहेत. ११ वा आयुर्वेद दिवस २३ सप्टेंबर आणि जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन १ ऑक्टोबरच्या अनुषंगाने ‘निरोगी उद्यासाठी आयुर्वेद’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येत आहे.

१७ सप्टेंबर रोजी सन्मती हायस्कूल, तारदाळ येथे सेवा संकल्प अभियानांतर्गत २५० शालेय मुलांसाठी योग व ध्यान शिबिर घेण्यात आले. तसेच उपजिल्हा रुग्णालय गारगोटीच्या आयुष विभागामार्फत सुदर्शन नगर मित्रमंडळ, गारगोटी येथे आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५२ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

 डॉ. स्नेहल कुलकर्णी यांनी शारीरिक व मानसिक आरोग्याबाबत, तर डॉ. सविता शेट्टी यांनी ज्येष्ठ नागरिकांना आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. एकूण ३८ रुग्णांची रक्ततपासणी करण्यात आली.

१८ सप्टेंबर रोजी उपजिल्हा रुग्णालय गडहिंग्लजमार्फत महावितरण कार्यालयात ‘श्रीगणेशा आरोग्याचे’ अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुर्वेद व योगाबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात ८१ रुग्णांची तपासणी करण्यात आली.

१९ सप्टेंबर रोजी सेवा संकल्प अभियान व आयुर्वेद दिनांतर्गत आयुष्मान आरोग्य मंदिर (आयुष), तारदाळ आणि श्री गणेश मंडळ, श्रीरामनगर, तारदाळ यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५३ लाभार्थ्यांना सेवा देण्यात आली. तसेच रक्तदान शिबिर घेण्यात आले असून २० नागरिकांनी रक्तदान केले.

याच दिवशी नांदगाव येथे गणेश तरुण मंडळ, नांदगाव येथे आयुर्वेद, दिनचर्या, ऋतुचर्या, योग, प्राणायाम व असंसर्गजन्य आजारांबाबत माहिती देण्यात आली.

२० सप्टेंबर रोजी ग्रामीण रुग्णालय सोळांकुरतर्फे ‘श्रीगणेशा आरोग्याचे’ अभियान राबविण्यात आले. यावेळी आयुर्वेद व योगाबाबत माहिती देण्यात आली. शिबिरात १३० रुग्णांची तपासणी करण्यात आली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes