SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सेवा संकल्प अभियानांतर्गत १७ ते २० सप्टेंबरदरम्यान विविध आरोग्य उपक्रमबाप्पांचे विसर्जन, अन् मार्गावर ३० टन कचऱ्याचा डोंगर; कोल्हापूर महापालिकेने अवघ्या काही तासांत परिसर केला चकाचक!कोल्हापूरातील सहा तालुक्यांना दुष्काळाची ‘प्रथम कळ’ लागू; जिल्ह्यात बाधितांना मिळणार विविध सवलतीडॉ. डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकमध्ये 'गौराई खेळ' स्पर्धा उत्साहातमातंग समाजाच्या स्वतंत्र आरक्षणासाठी २९ ऑगस्ट रोजी मुंबईत महामोर्चा; कोल्हापुरातून १५ हजार बांधव होणार सहभागीराज्यातील २६५ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर; शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी विविध उपाययोजना लागूज्येष्ठ संगीतकार, गायक श्रीधर फडके यांच्या गीतांनी जिंकली कोल्हापूरकरांची मनेगणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकोल्हापूरचा पर्यावरणस्नेही विक्रम! इराणी खणात तब्बल २,९१९ गणेशमूर्तींचे विसर्जन; प्रशासनाची २५ तासांहून अधिक अविरत सेवाजागतिक कर्णबधिर दिन: समाजाची जबाबदारी आणि समावेशकता

जाहिरात

 

गणरायावर मान्यवरांकडून पुष्पवृष्टी; ‘कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो’ ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

schedule26 Sep 26 person by visibility 165 category

मुंबई : गिरगाव चौपाटी येथे गणेश विसर्जन सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गणरायावर पुष्पवृष्टी केली. भक्तिभावाने श्री गणेशाला निरोप देताना, कुबुद्धीचे विसर्जन करून सर्वांना सुबुद्धी येवो अशी प्रार्थना मुख्यमंत्र्यांनी गणरायाला केली.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांनी शिस्त आणि पर्यावरणपूरकतेच्या आवाहनाला प्रतिसाद देत उत्सव साजरा केला आहे. मुंबई महानगरपालिका आणि मुंबई पोलिसांकडून या उत्सवाचे अतिशय शिस्तबद्ध नियोजन करण्यात आले आहे.

यावेळी कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा, बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या महापौर रितू तावडे, खासदार मिलिंद देवरा, आमदार अमित साटम, मुख्य सचिव राजेश अग्रवाल, आयुक्त अश्विनी भिडे, मुंबईच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, बेस्ट समिती अध्यक्षा तृष्णा विश्वासे, अतिरिक्त आयुक्त अविनाश ढाकणे, उपायुक्त चंदा जाधव आणि प्रशांत सपकाळ, सहायक आयुक्त संतोष साळुंके तसेच विविध देशांचे भारतातील महावाणिज्यदूत आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes