SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
ड्रग्जचा प्रादुर्भाव हा 'नार्को-टेररिझम'चा भाग; भाजयुमोची पोलिसांच्या सहकार्याने राज्यव्यापी मोहिमेची मागणी!कोल्हापूर आय.टी. पार्कचा ताबा एमआयडीसीकडे सुपूर्तऊस आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या विविध प्रश्नांची केंद्र सरकारकडून दखल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस​पाणी जपून वापरा! काळम्मावाडी सबस्टेशनच्या कामामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीतदुचाकीसाठी नवी नोंदणी मालिका 3 जूनपासूनस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील ४० उमेदवारांवर अपात्रतेची कारवाईइंटर एनसीसी ग्रुप स्पोर्ट्स शूटिंग स्पर्धेला उत्साहात प्रारंभकोलोली येथील महिला खुनाचा गूढ उकलला; अतिप्रसंगाला प्रतिकार केल्यानेच केली होती हत्या, स्थानिक गुन्हे शाखेकडून आरोपीला अटक!करवीर तालुक्यात संजय गांधी व श्रावणबाळ योजनेची पेन्शन रखडली; शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे तहसीलदारांना निवेदनराष्ट्रवादीतील ‘पेल्यातील वादळ’ पेल्यातच शमले; 'गोकुळ' आणि साखर कारखानदारीच्या प्रश्नांवर मंत्री हसन मुश्रीफ यांचे मोठे वक्तव्य!

जाहिरात

 

​पाणी जपून वापरा! काळम्मावाडी सबस्टेशनच्या कामामुळे कोल्हापूरचा पाणीपुरवठा विस्कळीत

schedule27 May 26 person by visibility 125 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीमार्फत सोमवार व मंगळवार, दिनांक 1 व 2 जून 2026 रोजी काळम्मावाडी 33 केव्ही सबस्टेशन येथे आयसोलेटर बसविण्याचे काम हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे येथील विद्युत पुरवठा बंद राहणार असल्याने काळम्मावाडी योजनेमधून शहराला पाणीपुरवठा होऊ शकणार नाही.

  तथापि, पर्यायी व्यवस्था म्हणून शहरास शिंगणापूर, बालिंगा व नागदेववाडी पंपिंग स्टेशनमधून पाणीपुरवठा करण्यात येणार आहे. त्यामुळे सोमवार व मंगळवार, दिनांक 1 व 2 जून 2026 रोजी शहरातील दैनंदिन पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार असून बुधवार, दिनांक 3 जून 2026 पासून पाणीपुरवठा सुरळीत होणार येईल.

 यामध्ये ए व बी वॉर्ड तसेच त्यास सलग्न उपनगरे व ग्रामीण भाग, लक्षतीर्थ वसाहत, संपूर्ण फुलेवाडी रिंगरोड, सानेगुरुजी वसाहत, राजेसंभाजी परिसर, क्रशर चौक, आपटेनगर टाकी परिसर, राजोपाध्येनगर, कणेरकरनगर, क्रांतीसिंहनाना पाटीलनगर, तुळजाभवानी कॉलनी, देवकर पाणंद, टेंभेरोड, शिवाजी पेठ, चंद्रेश्वर गल्ली, तटाकडील तालीम परिसर, साकोली कॉर्नर, उभा मारुती चौक, बिनखांबी गणेश मंदिर परिसर, महाद्वार रोड व मंगळवार पेठेतील काही भागांचा समावेश आहे. तसेच सी व डी वॉर्डमधील दुधाळी, गंगावेश, उत्तरेश्वर पेठ, शुक्रवार पेठ, ब्रम्हपुरी, बुधवार पेठ, सिद्धार्थनगर, पापाची तिकटी, लक्ष्मीपुरी, शनिवार पेठ, सोमवार पेठ, ट्रेझरी ऑफिस परिसर, बिंदू चौक, कॉमर्स कॉलेज परिसर, आझाद चौक, उमा टॉकीज परिसर, महालक्ष्मी मंदिर परिसर, गुजरी, मिरजकर तिकटी व देवल क्लब परिसरातही पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे.

 ई वॉर्ड अंतर्गत कसबा बावडा, रमणमळा, ताराबाई पार्क, कदमवाडी, भोसलेवाडी, शिवाजी पार्क, रुईकर कॉलनी, बापट कॅम्प, राजीव गांधी वसाहत, लोणार वसाहत, लिशा हॉटेल परिसर, महाडीक वसाहत, टेंबलाईवाडी, माळी कॉलनी, साईक्स एक्स्टेंशन, राजारामपुरी 1 ली ते 13 वी गल्ली, मातंग वसाहत, यादवनगर, उद्यमनगर, शास्त्रीनगर, राजारामपुरी एक्स्टेन्शन, टाकाळा, पांजरपोळ, सम्राटनगर, प्रतिभानगर, दौलतनगर, शाहूनगर, राजेंद्रनगर, इंगळे मळा, वैभव सोसायटी, शांतीनिकेतन परिसर, ग्रीन पार्क परिसर, शाहूपुरी 1 ली ते 4 थी गल्ली व व्यापार पेठ या परिसरांमध्येही पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होणार आहे.

तरी नागरिकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे, असे आवाहन महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes