SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय ओव्हरडोझ जनजागृती दिन: व्यसनमुक्ती आणि संवर्धनाचा संदेशजिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकररक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराजऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी : पै. विष्णु जोशीलकरराष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी बुद्धिबळाच्या सिमलटेनियस प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्सकै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी बुद्धिबळाच्या सिमलटेनियस प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसाद

schedule30 Aug 26 person by visibility 274 categoryक्रीडा

इचलकरंजी : राष्ट्रीय क्रीडा दिनाचे औचित्य साधून येथील DKTE सोसायटीच्या यशवंतराव चव्हाण पॉलिटेक्निकमध्ये शनिवार, २९ ऑगस्ट २०२६ रोजी विशेष सिमलटेनियस चेस एक्झिबिशनचे (बुद्धिबळ प्रदर्शन) आयोजन करण्यात आले. केन चेस अकॅडमी, इचलकरंजी यांच्या सहकार्याने पार पडलेल्या या आगळ्यावेगळ्या उपक्रमामुळे पॉलिटेक्निकच्या प्रांगणात बुद्धिबळाची जोरदार रंगत पाहायला मिळाली.

​कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण म्हणजे, आंतरराष्ट्रीय मानांकित खेळाडू FIDE D.I. रोहित पोळ, अथर्व तावरे आणि रुद्र माने या तीन नामवंत खेळाडूंनी एकाच वेळी ३२ विद्यार्थी-विद्यार्थिनींविरुद्ध मैदानात उतरून सामने खेळले. या अनोख्या प्रदर्शनातून विद्यार्थ्यांना खेळातील कूटनीती, अचूक निर्णयक्षमता, संयम आणि एकाग्रतेचे धडे प्रत्यक्ष खेळातून मिळाले.

​वेद शिंगारे या होतकरू खेळाडूने आंतरराष्ट्रीय मानांकित रुद्र माने यांच्याविरुद्ध जिद्दीने खेळत सामना बरोबर (ड्रॉ) राखत उपस्थितांची वाहवा मिळवली.
​श्रवरी आंबी आणि कीर्तीकुमार बागडे यांनीही आपल्या चमकदार खेळाचे प्रदर्शन करत उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
​या तिन्ही गुणवंत खेळाडूंच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत त्यांना विशेष बक्षीस देऊन गौरविण्यात आले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पॉलिटेक्निकचे प्राचार्य ए. पी. कोथळी होते. यावेळी रमेश खोत , जगताप , मनोजकुमार सुतार, रुग्गे  आणि कांबळे  यांची विशेष उपस्थिती लाभली.

 बुद्धिबळामुळे विद्यार्थ्यांची बौद्धिक क्षमता, तार्किक विचारशक्ती आणि आत्मविश्वास वाढीस लागतो, असा सूर यावेळी उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

​राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त आयोजित या उपक्रमामुळे ३२ विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळाडूंसोबत थेट भिडण्याची आणि खेळातील बारकावे आत्मसात करण्याची सुवर्णसंधी लाभली. या यशस्वी आयोजनाबद्दल केन चेस अकॅडमी आणि DKTE प्रशासनाचे कौतुक होत आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes