SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आंतरराष्ट्रीय ओव्हरडोझ जनजागृती दिन: व्यसनमुक्ती आणि संवर्धनाचा संदेशजिजाऊ बसमुळे ग्रामीण भागातील वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम होईल : आमदार यड्रावकररक्षाबंधन प्रेम, श्रद्धा, समता आणि संरक्षणाची भावना दृढ करण्याचा दिवस : मुनिश्री सारस्वत सागरजी महाराजऑलिपिकवीर खाशाबा चरित्र सर्वांना नेहमी प्रेरणादायी : पै. विष्णु जोशीलकरराष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ DKTE पॉलिटेक्निकमध्ये राष्ट्रीय क्रीडा दिनी बुद्धिबळाच्या सिमलटेनियस प्रदर्शनाला अभूतपूर्व प्रतिसादडी. वाय. पाटील अभियांत्रिकी कॉम्प्युटर सायन्सच्या विद्यार्थ्यांना १८५ हून अधिक जॉब ऑफर्सकै. आनंदराव जाधव सेवा संस्था ही स्वातंत्र्यसैनिकांनी लावलेली ज्योत : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादनझोपडपट्टीधारकांना मालकी हक्काचे पट्टे देऊन थांबणार नाही, तर मूलभूत सुविधाही पुरविणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस;बालकांच्या संविधानिक हक्कांवरील ‘कलरिंग बुक’चे मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते लोकार्पण

जाहिरात

 

राष्ट्रीय महामार्गावरील कागलमधील पिलरचा पूल देशात सर्वात सुंदर बनेल : वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

schedule30 Aug 26 person by visibility 253 categoryराज्य

◼️२९५ कोटींच्या, ५० पिलरच्या  पुलाचा पायाभरणी समारंभ उत्साहात
​          
कागल : राष्ट्रीय महामार्गावर कागलमध्ये  पिलरचा पूल होणे ही आम्हा कागलकरांसाठी अत्यंत आनंदाची बाब आहे. राष्ट्रीय महामार्गावरील कागलमधून जाणारा हा पिलरचा पुल देशात सर्वात सुंदर पुल बनेल, अशी अपेक्षा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी व्यक्त केली. राष्ट्रीय महामार्गावर कागल शहरातून जाणारा हा पुल भरावाच्या बोगद्याच्या पुलाऐवजी पिलरचा उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे मी केली होती. त्यांनी या मागणीला सत्वर मंजुरी दिली आणि तातडीने त्याच्या निविदाही निघाल्या. याबद्दल केंद्रीय मंत्री  गडकरी यांचे आभारी आहोत, असेही ते म्हणाले.
           
मुंबई -बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कागलमध्ये होणाऱ्या पिलरच्या उड्डाणपुलाचा पायाभरणी समारंभ मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. २९५ कोटी निधीमधून एक किलोमीटर लांबीचा व ५० पिलरचा हा पूल येत्या दीड वर्षात पूर्ण होणार आहे. 
          
मंत्री  मुश्रीफ म्हणाले, याआधीच्या निर्धारित कंत्राटदारांना साक्षात केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी बजावूनसुद्धा ते काम सोडून पळून गेले आहेत.  नव्याने काम घेतलेले कंत्राटदार  धारीवाल यांच्या कामाची गती जलद आहे. या पुलाचा संपूर्ण आराखडा कागल शहरात आहे, त्यामुळे या पुलाचे काम पूर्णत्वाला जात असताना शहराच्या नागरिकांना त्रास होऊ नये याची दक्षता घ्या. युटिलिटी शिफ्टिंगची कामे काळजीपूर्वक व व्यवस्थितपणे पार पाडा. कागल नगरपालिका आणि आम्ही सर्वजणच तुमच्या पाठीशी उभे आहोत. चांगले काम करणाऱ्यांच्या पाठीशी आम्ही नेहमीच उभे असतो आणि खराब काम करणाऱ्यांच्या पाठी आम्ही दांडके घेऊन लागतो.
​हा पूल पूर्ण झाल्यानंतर ही कंपनी सर्वत्र सांगेल की आम्ही देशात अनेक ठिकाणी कामे केली परंतु; कागलसारखे प्रेम आम्हाला कुठेच मिळाले नाही.
       
◼️पिलरच्या पुलाचे फायदे......!
● वाहतुकीची कोंडी होणार नाही. 
●नवीन बस स्थानकासाठी नव्याने भूसंपादन करावे लागणार नाही. 
●महामार्गालगतचे रहिवाशी, हातगाडीवाले, फळविक्रेते, चहा टपरीवाले व छोटे व्यावसायिक विस्थापित होणार नाहीत. 
●कर्नाटकातून येणारी वाहने, रस्त्याच्या दुतर्फा असणाऱ्या शेतीमधून कागलमधील साखर कारखान्यांना होणारी ऊस वाहतूक सुरळीत होईल. 
●स्थानिक बस वाहतूक, रिक्षा व वडाप  ही वाहतूकसुद्धा सुरळीत होईल व अपघात टळतील.
               
यावेळी राष्ट्रीय महामार्ग कृती समितीचे अध्यक्ष व केडीसीसी बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगराध्यक्षा  सविता माने, चंद्रकांत गवळी, प्रवीण काळबर, अमित पिष्टे, विवेक लोटे, नवाज मुश्रीफ, बबलू सागवान, विवेक सोनीजी , संदीप आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes