कोल्हापुरातील सायबर चौक परिसरात ट्रकचा अपघात, चार वाहनांचे नुकसान
schedule09 Dec 25 person by visibility 258 categoryगुन्हे
कोल्हापूर : येथील सायबर चौक परिसरातील सिग्नलवर भीषण अपघात झाला. या अपघातात तीन ते चार जण जखमी झाल्याचे समोर आले आहे. राजाराम कॉलेजकडून येणारी वाहने सायबर कॉलेजसमोर सिग्नल वर थांबली होती. यावेळी पाठीमागून आलेल्या भरधाव ट्रकने थेट कार टेम्पो बस यांना थेट धडक दिली. ट्रकच्या या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठं नुकसान तर तीन ते चार जण जखमी झाल्याचे समजते.
सायबर चौक परिसरातील सिग्नलवर शिवाजी विद्यापीठाकडून येणाऱ्या ट्रकचे नियंत्रण सुटल्याने ट्रक तीन वाहनांवर पलटी झाला. उतारामुळे ट्रकचा ब्रेक फेल झाल्याची शक्यता आहे. ट्रकच्या या विचित्र अपघातात चार वाहनांचे मोठं नुकसान झाले. दरम्यान वाहतुकीनं दरम्यान अपघातानंतर या मार्गावरील वाहतूक ठप्प झाली होती यावेळी वाहतूक शाखेच्या पोलिसाकडून अन्य मार्गावरून वाहतूक वळवण्यात आली.