SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान

schedule03 Feb 26 person by visibility 163 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : हिंदी विकास संस्थान, नवी दिल्ली यांच्या वतीने आयोजित आंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाड–२०२५ मध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूल, कोल्हापूर येथील विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन केले. या स्पर्धेत शाळेतील रुही भंडारी इयत्ता 6 वी व सृजनी हलदार इयत्ता 10 वी या दोन विद्यार्थिनींची  'राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान' साठी निवड झाली.
 त्यांनी हिंदी विषयात उत्कृष्ट कामगिरी करत सुवर्ण पदक पटकावले व त्यांची निवड राष्ट्रीय स्तरावरील हिंदी प्रतिभा सन्मानासाठी करण्यात आली.

हिंदी विकास संस्थान, दिल्ली यांच्या मार्फत आयोजित केलेल्या आंतरराष्ट्रीय हिंदी सन्मान समारंभ–२०२५ अंतर्गत ३० जानेवारी २०२६ रोजी नवी दिल्ली येथील तीन मूर्ती भवन, प्रधानमंत्री संग्रहालय येथे झालेल्या भव्य समारंभात डॉ. पूरन चंद टंडन - निदेशक, भारतीय अनुवाद परिषद, नवी दिल्ली, डॉ. पीयूष कुमार शर्मा - अध्यक्ष , हिंदी विकास संस्थान , दिल्ली यांच्या हस्ते रुही व सृजनीला प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. 

तसेच हिंदी विषय शिक्षिका ज्योती मस्के यांना शिक्षक प्रशस्तीपत्र व प्राचार्य अस्कर अली यांना प्रधानाचार्य गौरव सन्मान प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. 

या यशाबद्दल शाळेचे चेअरमन संजय घोडावत, विश्वस्त विनायक भोसले, संचालिका सस्मिता मोहंती,  प्राचार्य अस्कर अली, शिक्षक व पालकांनी या विद्यार्थिनींचे अभिनंदन व कौतुक केले.  "हिंदी भाषेच्या अध्ययनात सातत्यपूर्ण परिश्रम आणि मार्गदर्शनामुळे हे यश मिळाल्याचे मत संचालिका सस्मिता मोहंती यांनी व्यक्त केले. या सन्मानामुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढून इतर विद्यार्थ्यांनाही प्रेरणा मिळेल, अशी भावनाही यावेळी त्यांनी व्यक्त केली."

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes