SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

निवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालत

schedule03 Feb 26 person by visibility 170 categoryराज्य

कोल्हापूर : मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबईव्दारे टपाल विभागाच्या निवृत्ती वेतनधारकांसाठी, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी 58 वी पेन्शन अदालत दिनांक 17 मार्च रोजी 11.30 वाजता मुख्य पोस्टमास्तर जनरल, महाराष्ट्र सर्कल, मुंबई - 400 001 येथे आयोजित करण्यात आली आहे, अशी माहिती कोल्हापूर विभागाचे प्रवर डाक अधीक्षकांनी दिली आहे.

निवृत्ती वेतनधारकांच्या लाभाशी संबंधित तक्रारी, जे टपाल विभागातून निवृत्त झाले आहेत, ज्यांचा सेवेत असताना मृत्यु झाला आहे. टपाल विभाग, महाराष्ट्र आणि गोवा राज्याचे निवृत्तीवेतनधारक ज्यांची 3 महिन्यांच्या आत पूर्तता झालेली नाही अशा प्रकरणांचा डाक पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाईल.

पेन्शनधारकांनी आपली तक्रार वैयक्तिकरित्या विहीत नमुन्यात तीन प्रतीमध्ये वरिष्ठ  लेखा अधिकारी, सचिव, पेन्शन अदालत, मुख्य पोस्टमास्तर जनरल कार्यालय, महाराष्ट्र सर्कल, मुंबई जी.पी. ओ. इमारत, पहिला मजला, मुंबई - 400 001 येथे किंवा aeets.mh@indiapost.gov.in या  ई मेल वर  16 फेब्रुवारी रोजी किंवा त्यापूर्वी सादर करावी. 16 फेब्रुवारीनंतर मिळालेल्या अर्जांवर पेन्शन अदालतमध्ये विचार केला जाणार नाही.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes