SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलडीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी व एमबीए ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 'कोल्हापुरात' एल्गार; 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापनाके.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ८६.२२ टक्के दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ६ जुलैपर्यंत नोंदणीची संधीडी. वाय. पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटकागलच्या जयसिंगराव तलावाजवळचा कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणीस स्थगितीगडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव येथील पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद; वाहतूक आजरा मार्गे वळवलीकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: पंचगंगा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

गडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव येथील पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद; वाहतूक आजरा मार्गे वळवली

schedule03 Jul 26 person by visibility 245 categoryराज्य

गडहिंग्लज : गडहिंग्लज तालुक्यातील भडगाव येथे हिरण्यकेशी नदीवर नवीन पुलाचे बांधकाम सुरू आहे. या कामासाठी नदीपात्रात तयार करण्यात आलेला पर्यायी पूल (कॉजवे) वाढत्या जलप्रवाहामुळे खचू लागला आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा विचार करता, प्रशासनाने या पर्यायी पुलावरील वाहतूक तातडीने बंद केली आहे.

नदीतील पाण्याचा स्तर वाढत असल्याने पुलाचा काही भाग खचल्याचे निदर्शनास आले. कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून प्रशासनाने पुलाच्या दोन्ही बाजूंना बॅरिकेड्स लावून आणि फ्लेक्सद्वारे सूचना देऊन वाहतूक बंद केली आहे.

 सुरक्षेच्या कारणास्तव त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे.यामुळे गडहिंग्लजकडून चंदगडकडे जाणारी सर्व वाहतूक आता आजरा-गजरगाव मार्गे वळवण्यात आली आहे. वाहनधारकांनी प्रशासनाच्या सूचनांचे पालन करावे आणि पर्यायी मार्गाचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes