SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर महानगरपालिका शाळा ठरल्या जिल्ह्यात अव्वलडीकेटीई मध्ये प्रथम वर्ष पदवी व एमबीए ऑनलाईन रजिस्ट्रेशन फॉर्म भरण्यास सुरुवात साखर कारखानदारी आणि शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी 'कोल्हापुरात' एल्गार; 'शेतकरी व साखर कारखानदारी बचाव आंदोलना'ची स्थापनाके.डी.सी.सी. बँकेची पीक कर्ज वसुली ८६.२२ टक्के दहावी नंतरच्या पदविका अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; ६ जुलैपर्यंत नोंदणीची संधीडी. वाय. पाटील अभियांत्रिकी केमिकलच्या ५५ विद्यार्थ्यांना प्लेसमेंटकागलच्या जयसिंगराव तलावाजवळचा कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करापुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेतील पात्र शेतकऱ्यांच्या थकीत कर्जावर व्याज आकारणीस स्थगितीगडहिंग्लज-चंदगड मार्गावरील भडगाव येथील पर्यायी पूल वाहतुकीसाठी बंद; वाहतूक आजरा मार्गे वळवलीकोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम: पंचगंगा नदीवरील अनेक बंधारे पाण्याखाली

जाहिरात

 

कागलच्या जयसिंगराव तलावाजवळचा कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करा

schedule03 Jul 26 person by visibility 241 categoryराज्य

◼️मुंबईतील बैठकीत जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या सूचना
◼️श्रीमंत जयसिंगराव घाटगे  तलाव तुडुंब भरून राहणार
                         
मुंबई : कागलच्या श्रीमंत  जयसिंगराव घाटगे तलावाजवळचा अर्धवट राहिलेला कालवा अस्तरीकरणासह पूर्ण करा, अशा सूचना जलसंपदा मंत्री डाॅ. राधाकृष्ण विखे- पाटील यांच्या सूचना दिल्या. मुंबईत मंत्रालयात मंत्री विखे -पाटील व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या उपस्थितीत ही महत्त्वाची बैठक झाली.

 यावेळी के.डी.सी.सी.  बँकेचे संचालक प्रताप उर्फ भैय्या माने, नगसेवक  प्रवीण काळबर, कागल नगरपालिकेचे मुख्याधिकारी  अजय पाटणकर तसेच; महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे वरिष्ठ अधिकारी, मुख्य अभियंता तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
      
बैठकीत कालव्याची लेवल खाली व तलावाची लेवल उंचीवर असल्यामुळे कालव्यामधून तलावात येणारे पाणी बंद झाल्याच्या विषयावर सविस्तर चर्चा झाली. जयसिंगराव तलावातील घटलेल्या पाणीसाठ्यास कारणीभूत दूधगंगा डाव्या कालव्यामुळे तलाव भरण्यासाठी लागणारी पाणीपट्टीची रक्कम माफ करणे.  तसेच; दूधगंगा मोठा पाटबंधारे प्रकल्पांतर्गत दूधगंगा डाव्या कालव्याची कागल नगरपरिषद हद्दीतील प्रलंबित असलेली कामे तातडीने सुरू करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली. शहराला पाणी मोफत द्या आणि पाणीपट्टी माफ करा, अशी मागणीही कागल नगरपालिकेने केली. 
         
यावेळी मंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व विषयांवर आवश्यक ती प्रशासकीय कार्यवाही तातडीने पूर्ण करून कामांना गती देण्याचे निर्देश दिले. कागल शहर व परिसरातील नागरिकांच्या दृष्टीने महत्त्वाचे असलेले पाणीपुरवठा व सिंचनाशी संबंधित प्रश्न प्राधान्याने मार्गी लावण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

बैठकीनंतर वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले की, कागलच्या विकासासाठी अत्यंत महत्त्वाचे असलेल्या या विषयांवर शासन स्तरावर सकारात्मक निर्णय प्रक्रियेला सुरुवात झाली असून, संबंधित कामे लवकरच प्रत्यक्षात सुरू होतील. त्यामुळे कागल शहर व परिसरातील नागरिकांना दिलासा मिळणार असून विकासकामांना निश्चितच गती मिळेल.
           
जयसिंगराव तलावाची पाणी पातळी कॅनॉलमुळे कशी कमी होते व त्यामध्ये येणारे पाणी कसे खंडित झाले आहे याचे सविस्तर स्पष्टीकरण प्रवीण काळबर यांनी मांडले
         
भैय्यासाहेब माने यांनी कॅनॉल पूर्णत्वास येण्याकरिता कागल शहरातील दोनच किलोमीटर कालवा अपूर्ण असल्याचे निदर्शनास आणून दिले. त्याचे काम पूर्ण करून अस्तरीकरण करण्याचे निर्देश दिले. कॅनॉल संदर्भात सविस्तर अभ्यासपूर्वक चर्चा भैय्यासाहेब माने यांनी घडवून आणली.
        
◼️या बैठकीत प्रताप उर्फ भैया माने यांनी मांडलेले विविध मुद्दे असे.......         
□ सध्या कागल जयसिंग तलाव किलोमीटर नंबर 65 पर्यंत दूधगंगा डावा कालव्याचे पाणी सन जुलै 2022 आलेले आहे. त्यानंतर कागल तालुका हद्दीतील किलोमीटर 65 ते किमी 72 व कागल पासून पुढे हातकणंगले तालुक्यातील किलोमीटर 72 किलोमीटर 76 या अंतरामध्ये अद्याप पाणी पोहोचणे आवश्यक आहे. 
□ त्यासाठी आवश्यक असणारे पाझर तलावा शेजारील भरावेचे काम काळी माती व मुरमा विना तसेच विहिरीच्या संपादनासाठी अद्याप पेंडिंग आहे असे समजते.    
□ कागल कत्तलखाना ते हुपरी कारखान्यापर्यंत कॅनॉलचे पूर्ण काम झालेले दिसते.. परंतु कागलपासून पुढील कॅनलला छेदत असलेल्या शेतीसाठीच्या बऱ्याचशा पाईपलाईन असल्यामुळे सलगतेने काम करता येत नाही. 
□ उर्वरित असणाऱ्या बांधकामाचे डिझाईन ड्रॉईंग अजून मंजूर नाही असे समजते.
□ ठेकेदारांनी काम करून कागलपर्यंत पाणी आणलेले आहे..सध्या साइट वरती ठेकेदाराचे मशिनरी व मनुष्यबळ काम करताना दिसत आहे परंतु अध्यापपर्यंत ज्या तीव्रतेने काम पूर्ण होऊन पाणी किलोमीटर 76 ला जायला पाहिजे होते ते गेलेले दिसत नाही...त्यामुळे काही ठेकेदाराच्या अडचणी असतील तर त्या सोडवून काम किलोमीटर 76 पर्यंत होणे गरजेचे आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes