SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

हा अर्थसंकल्प नाही, तर जनतेची क्रूर थट्टा : आमदार सतेज पाटील

schedule01 Feb 26 person by visibility 309 categoryराज्य

केंद्र सरकारचा २०२६ चा अर्थसंकल्प म्हणजे आकड्यांची धूळफेक आणि पोकळ घोषणांचा सुकाळ आहे. ज्यांच्या घरात चूल पेटते की नाही याची चिंता आहे, त्यांच्यासाठी हा अर्थसंकल्प म्हणजे एक क्रूर विनोद आहे. मनरेगाच्या बजेटमध्ये तब्बल ६५% कपात करून सरकारने लोकांच्या तोंडाचा घास पळवला. रोजगाराची हमी देणारी ही योजना या सरकारने उपासमारीची हमी देऊ केली आहे. अशी टीका विधानपरिषदेतील काँग्रेस गटनेते, आमदार सतेज  पाटील यांनी केली

ते म्हणाले, स्मार्ट सिटीच्या अपयशावर पांघरूण घालण्यासाठी आता सिटी इकॉनॉमिक रिजन नावाचं नवीन गाजर दाखवलं जात आहे. एकीकडे तरुण बेरोजगार फिरत आहेत, उद्योगधंदे बंद पडत आहेत, गुंतवणूकदार देश सोडून जात आहेत आणि घराघरातली बचत संपत चालली आहे. बळीराजा संकटात आहे, मग कुणासाठी आहे हा अर्थसंकल्प?

कोल्हापूरसाठी तर या बजेटमधून भोपळा हाती लागला असून कोणतीच मोठी गोष्ट आपल्यासाठी दिलेले दिसत नाही. शिवाय, ज्या घोषणा केल्या आहेत त्यापैकी एकाचीही अंमलबजावणी कशी होणार याची स्पष्ट दिशा दिसत नाही.  वाढत्या कर्जाच्या डोंगराकडे आणि येऊ घातलेल्या जागतिक संकटांकडे हे सरकार पूर्णपणे डोळेझाक करत आहे. हा अर्थसंकल्प वाचताना सरकारला सामान्य लोकांची पर्वा नाही हेच दिसून येते असे आमदार सतेज पाटील म्हणाले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes