SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

जाहिरात

 

गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन

schedule20 Jun 26 person by visibility 131 categoryउद्योग

  ▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रमुख उपस्थिती

  कोल्हापूर : केंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या प्रशासकीय इमारतीचे उद्घाटन व कल्लाप्पाण्णा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याचा नामविस्तार करण्यात आला. यावेळी बँकेच्या प्रशासकीय इमारतीच्या परिसरात उभारण्यात आलेल्या कोनशिलेचे अनावरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.

  कार्यक्रमास कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, सांस्कृतिक कार्यमंत्री ॲड आशिष शेलार, वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकारे, ग्रामविकास व पंचायतराज मंत्री जयकुमार गोरे, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राजेंद्र पाटील - यड्रावकर, आमदार डॉ. राहुल आवाडे, आमदार शिवाजी पाटील, आमदार रवींद्र चव्हाण, माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे, माजी वस्त्रोद्योग मंत्री प्रकाश आवाडे, जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोड, इचलकरंजीचे महापौर उदय धातुंडे, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, पोलीस अधीक्षक निलोत्पल, बँकेचे अध्यक्ष स्वप्निल आवाडे तसेच बँक व साखर कारखान्याचे पदाधिकारी, अधिकारी, मान्यवर उपस्थित होते.

  ▪️बँकेविषयी थोडक्यात :
  'महाराष्ट्राचे मँचेस्टर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या इचलकरंजीच्या औद्योगिक इतिहासाशी घट्ट नाते असलेली 'कल्लाप्पाण्णा आवाडे इचलकरंजी जनता सहकारी बँक ही सहकारी बँकिंग क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था आहे. या बँकेची स्थापना 5 नोव्हेंबर 1962 रोजी झाली असून 7 फेब्रुवारी 1963 रोजी प्रत्यक्ष कामकाजास सुरुवात झाली.

  या बँकेने मल्टी-स्टेट स्तरावर एक "आर्थिक मॉडेल' म्हणून सिद्ध केले आहे. महाराष्ट्रासह कर्नाटक, गोवा आणि गुजरात राज्यात मिळून 55 शाखा आहेत.

  आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये बँकेच्या 55 शाखांच्या माध्यमातून 85 हजार 835 सभासद, 81 कोटी रुपयांपेक्षा अधिक भांडवल, 2975 कोटींच्या ठेवी व 1894 कोटीपेक्षा जास्त कर्ज वितरण करण्यात आले. स्वयंप्रकाश सोलर कर्ज, कृषी कर्ज, केंद्र शासनाची फूड प्रोसेसिंग योजना कार्यान्वित केली आहे. परदेशी व्यवहाराकरिता लागणारी लेटर ऑफ क्रेडिट व बँक गॅरंटी साठी परकीय चलन विनिमय, एआय चा वापर यासारख्या अनेक सुविधांचा लाभ बँकेने ग्राहकांना दिला आहे. शासनाच्या योजनांचा लाभ व कर्ज सुविधा पुरवून तरुणांना उद्योजक होण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे, अशी माहिती अध्यक्ष स्वप्निल आवाडे यांनी दिली.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes