SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
आरोग्यदूत प्रशांत साळुंखे यांच्या तत्परतेमुळे अपघातग्रस्त पती-पत्नीचा वाचला जीव!​भिमा हेल्थ झोनच्या विस्तारासाठी मुख्यमंत्री फडणवीसांकडे १० कोटींचा प्रस्ताव; कृष्णराज महाडिकांच्या प्रयत्नांना वेग.जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरणगृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते इचलकरंजी जनता सहकारी बँकेच्या नूतन इमारतीचे उद्घाटन 'हीच खरी शिवसेना', कोल्हापुरातील सभेतून अमित शाहांचे मोठे विधानडॉ. डी वाय पाटील पॉलिटेक्निकला भारत सरकारकडून पेटंट१४४५.९७ कोटींच्या श्री अंबाबाई मंदिर विकास आराखड्याचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शुभारंभ'हा देश म्हणजे धर्मशाला नाही!' कोल्हापूरच्या भूमीतून अमित शाह यांचा विरोधकांवर एल्गारजागतिक शरणार्थी दिन: माणुसकीच्या नात्याने संघर्षाला सलामकेंद्रीय गृह व सहकार मंत्री अमित शहा यांचे कोल्हापूर विमानतळावर आगमन व स्वागत

जाहिरात

 

जयसिंगपुरात राजर्षी शाहू महाराज व श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या पुतळ्याचे उद्या अनावरण

schedule20 Jun 26 person by visibility 180 categoryसामाजिक

▪️श्रीमंत खा. शाहू महाराज व मंत्री उदय सामंत यांची उपस्थिती

जयसिंगपूर : जयसिंगपूर शहराचे जनक म्हणून ओळखले जाणारे लोकराजा राजर्षी छत्रपती शाहू महाराज आणि त्यांचे जनकपिता श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या क्रांती चौक परिसरात उभारण्यात आलेल्या अर्धाकृती पुतळ्यांच्या लोकार्पण सोहळ्याचे आयोजन रविवारी, दि. २१ जून रोजी सकाळी ११ वाजता करण्यात आले आहे. जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने हा ऐतिहासिक आणि दिमाखदार सोहळा पार पडणार आहे.

श्रीमंत जयसिंग महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण खासदार शाहू छत्रपती महाराज यांच्या शुभहस्ते होणार असून, लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांच्या अर्धाकृती पुतळ्याचे अनावरण महाराष्ट्र राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे.

या कार्यक्रमासाठी हातकणंगले लोकसभा मतदारसंघाचे खासदार धैर्यशील माने प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. तर समारंभाच्या अध्यक्षस्थानी आमदार डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर असणार आहेत.

यावेळी माजी आमदार उल्हास पाटील, राजू शेट्टी, माधवराव घाटगे, जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण सभापती श्रध्दाताई गायकवाड, सभापती मिलिंद कुरणे, गणपतराव पाटील, सावकार मादनाईक, कुरुंदवाडच्या नगराध्यक्षा मनिषा डांगे, शिरोळच्या नगराध्यक्षा योगिता कांबळे, मुख्याधिकारी टीना गवळी यांच्यासह पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत.
जयसिंगपूर नगरपरिषदेच्या वतीने आयोजित करण्यात आलेला हा सोहळा शहराच्या इतिहासातील एक महत्त्वपूर्ण क्षण ठरणार आहे. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन नगराध्यक्ष संजय पाटील यड्रावकर व उपनगराध्यक्षा अनुराधा आडके यांनी केले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes