SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
समान नागरी कायद्याबाबत पुणे विभागात २९ नोव्हेंबरला जनसुनावणी नागरिकांना मते मांडण्याची संधी; संबंधित गट,संस्था व नागरिकांनी सहभागी व्हावे : शीतल तेली - उगलेराज्यातील जनतेला आरोग्य विषयक सर्वोत्तम सुविधा देण्यासाठी कटिबद्ध : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरहरोली, धरणगुत्ती, नांदणी आणि जांभळी गावात ५३६ जणांना मोफत चष्म्यांचे वाटप; ५३ जणांवर होणार मोतीबिंदू शस्त्रक्रियाउंचगावमध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात"दहा वर्षांत पक्षात आलेल्यांना पदे, मग ४० वर्षांच्या निष्ठेचं काय?" : आमदार राजेश क्षीरसागर यांचा सवालयेणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीनंतर आमदार शिवाभाऊंना ठाण्यामध्ये शोधावे लागेलधरणगुत्ती, हरोली गावच्या विकासाला निधी कमी पडू देणार नाही : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरतालीम संस्था केवळ शरीर कमावण्याची फॅक्टरी नव्हे तर सुसंस्कृत बनण्याचे विद्यापीठ, खासदार धनंजय महाडिक यांचे आवाहनसंविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात डॉ. संबोधी देशपांडे यांचे विशेष व्याख्यानमराठी नाट्यसृष्टीच्या आद्य कर्तृत्ववान शिल्पकार: हिराबाई पेडणेकर

जाहिरात

 

उंचगावमध्ये गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहात

schedule22 Nov 26 person by visibility 115 categoryसामाजिक

 ◼️४० मंडळांचा सहभाग; शिवकालीन इतिहासाला उजाळा

  कोल्हापूर  : करवीर तालुका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने व करवीर तालुका प्रमुख राजू यादव यांच्या पुढाकाराने उंचगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या भव्य गड-किल्ले बांधणी स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाला. या स्पर्धेमध्ये उंचगावमधील तब्बल ४० मंडळांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. सहभागी मंडळांनी विविध ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या आकर्षक प्रतिकृती साकारून आपल्या कलाकौशल्याचे आणि कल्पकतेचे दर्शन घडविले.

या स्पर्धेमध्ये सहभागी झालेल्या सर्व मंडळांनी अत्यंत मेहनत घेऊन आकर्षक आणि ऐतिहासिक गड-किल्ल्यांच्या प्रतिकृती साकारल्या. प्रत्येक मंडळाने वेगवेगळ्या संकल्पना आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना सादर केल्यामुळे स्पर्धेत चुरस निर्माण झाली. त्यामुळे द्वितीय व तृतीय क्रमांक दोन दोन मंडळांना  विभागून देण्यात आले.

यावेळी बोलताना करवीर तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास हा आपल्या अस्मितेचा आणि स्वाभिमानाचा विषय आहे. आजच्या आधुनिक आणि डिजिटल युगात नव्या पिढीला आपल्या गौरवशाली इतिहासाची ओळख करून देणे अत्यंत गरजेचे आहे. गड-किल्ले बांधणीच्या माध्यमातून मुलांना शिवरायांचा इतिहास, मावळ्यांचे शौर्य, स्वराज्याची निर्मिती आणि गड-किल्ल्यांचे महत्त्व समजते. या स्पर्धेला ४० मंडळांनी दिलेला प्रतिसाद कौतुकास्पद आहे. आमचा उद्देश केवळ स्पर्धा आयोजित करणे किंवा बक्षिसे देणे नसून शिवरायांचे विचार आणि इतिहास पुढील पिढीपर्यंत पोहोचविणे हा आहे. भविष्यातही अशा सामाजिक, ऐतिहासिक आणि सांस्कृतिक उपक्रमांना प्राधान्य दिले जाईल."

सरपंच मधुकर चव्हाण म्हणाले, "उंचगावमध्ये अशा प्रकारच्या स्पर्धांचे आयोजन होणे ही आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे. गावातील तरुण मंडळांनी एकत्र येऊन मेहनत आणि कल्पकतेच्या जोरावर सुंदर गड-किल्ले उभारले आहेत. अशा उपक्रमांमुळे युवकांमध्ये एकीची भावना निर्माण होते, तसेच आपल्या ऐतिहासिक वारशाचे जतन करण्याची प्रेरणा मिळते. या उपक्रमाला गावातील नागरिकांनी आणि मंडळांनी दिलेला प्रतिसाद निश्चितच कौतुकास्पद आहे."

उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट म्हणाले, "छत्रपती शिवाजी महाराजांनी निर्माण केलेले स्वराज्य आणि त्यांनी उभारलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राचे वैभव आहे. या ऐतिहासिक वास्तूंचे महत्त्व नव्या पिढीला समजणे आवश्यक आहे. गड-किल्ले बांधणी स्पर्धेमुळे मुलांच्या कल्पकतेला वाव मिळतो आणि त्यांच्यामध्ये इतिहासाविषयी जिज्ञासा निर्माण होते. अशा उपक्रमांच्या माध्यमातून शिवरायांचे विचार आणि स्वराज्याची प्रेरणा घराघरांत पोहोचविण्याचे काम झाले पाहिजे."

 यावेळी शरद माळी व सचिन नागटिळक यांनी प्रस्तावना व आभार मानले. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक शिवशक्ती तालीम मंडळ यादववाडी ग्रुप, द्वितीय क्रमांक विभागून जय शिवराय तालीम मंडळ रेडकर गल्ली व दर्शता मोरे ग्रुप, तृतीय क्रमांक विभागून ऋषिकेश जाधव विराज देशमुख मोळे कॉलनी ग्रुप, कृष्णराज राहुल म्हसवेकर ग्रुप, उत्कृष्ट सादरीकरण सार्थक भोगम ग्रुप तसेच सहभागी सर्व मंडळांना उत्तेजनार्थ सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले.

यावेळी करवीर तालुका प्रमुख राजू यादव, उंचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, उपजिल्हाप्रमुख पोपट दांगट, युवा सेना जिल्हाधिकारी कनिष्क शिंदे, युवासेना उपजिल्हाधिकारी  सचिन नागटिळक, फेरीवाला संघटनेचे उपतालुकाप्रमुख  बाळासाहेब नलवडे, युवासेना तालुकाधिकारी योगेश लोहार, शरद माळी, उत्तम अडसूळ, प्रकाश मुदुगडे, विरेंद्र भोपळे, शिवाजी लोहार, दीपक पोपटाणी, सुनील पारपानी, आबा जाधव, अजित चव्हाण, कृष्णात तुरुके, संदीप शेळके, धनंजय पाटील, रामराव पाटील आदि उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes