SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफांच्या मनगटावर लाडक्या भगिनींच्या प्रेमाची राखी; "माता-भगिनींचे आशीर्वाद हेच माझे खरे सुरक्षा कवच" - हसन मुश्रीफपहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्षभागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागागोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटीलप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी कालबध कार्यक्रम निश्चितमहिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधवभाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्यासंवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामत

जाहिरात

 

कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणार

schedule27 Aug 26 person by visibility 220 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी मार्केट येथील इमारतीच्या बाल्कनीचा गिलाव्याचा अंशतः भाग आज (दि. 27) दुपारी 12 वाजता चप्पल लाईन दुकानासमोरील बाजूस पडला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.

 छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीचे बांधकाम सन 1989 मध्ये पूर्ण झाले असून इमारतीस 37 वर्षे पूर्ण झाली आहेत. इमारतीच्या काही भागाचे यापूर्वी स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात आले आहे. तसेच संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याबाबत महापालिका पॅनेलवरील स्ट्रक्चरल इंजिनिअर यांना यापूर्वीच कळविण्यात आले असून, त्यानुषंगाने स्ट्रक्चरल ऑडिटचे काम सध्या सुरू आहे

दरम्यान, आज बाल्कनीचा गिलावा पडल्याची घटना घडल्यानंतर संबंधित इमारतीची पाहणी करण्यात आली. इमारतीच्या दुरुस्तीची आवश्यकता असल्याचे निदर्शनास आले आहे. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने तात्पुरती उपाययोजना म्हणून रस्त्याकडील बाजूस सेफ्टीनेट लावण्याची कार्यवाही करण्यात येत आहे. संपूर्ण इमारतीचे स्ट्रक्चरल ऑडिट पूर्ण झाल्यानंतर स्ट्रक्चरल अभियंत्यांनी सुचविलेल्या उपाययोजनांनुसार इमारतीच्या दुरुस्तीबाबत आवश्यक ती पुढील कार्यवाही करण्यात येणार आहे.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes