SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
पहिल्या महायुद्धादरम्यान इटली आणि जर्मनीचा संघर्षभागीरथी संस्थेच्या महिला भगीनींनी बांधला पोलीस अधिकारी आणि कर्मचार्‍यांना रक्षाबंधनाचा पवित्र धागागोकुळ निवडणुकीत शेतकरी पॅनेलची मोर्चेबांधणी; २५ जागा स्वबळावर लढवण्याची भूमिका : आमदार सतेज पाटीलप्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलची राष्ट्रभक्तीपर समूहगान स्पर्धेत हॅटट्रिक!कोल्हापूर : छत्रपती शिवाजी मार्केट इमारतीच्या बाल्कनीचा गिलावा पडला ; सुरक्षिततेसाठी सेफ्टीनेट लावणारकोल्हापूर महापालिकेच्यावतीने निवासी अतिक्रमण नियमितीकरणासाठी कालबध कार्यक्रम निश्चितमहिलांना संधी, हक्क आणि सुरक्षिततेची जाणीव करून देण्यावर भर: प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधवभाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्यासंवाद, जनजागृतीच्या माध्यमातून तृतीयपंथींचे समावेशन शक्य: कुलगुरू डॉ. राजनीश कामतडी. वाय. पाटील विद्यापीठात डिझाईनच्या नव्या पर्वाला सुरुवात

जाहिरात

 

भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश; पंचगंगा स्मशानभूमीतील दोन्ही धोकादायक कमानी उतरविल्या

schedule27 Aug 26 person by visibility 305 category

कोल्हापूर : कोल्हापूर शहरातील पंचगंगा नदीवरील स्मशानभूमी परिसरातील धोकादायक झालेल्या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने करण्यात आली होती. यासाठी भाजपा सचिव अमित शिंदे यांनी कोल्हापूर महानगरपालिका प्रशासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता.

पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही कमानींचा रंग उडालेला असून, त्यांच्या पाया तसेच बांधकामाला तडे गेल्याने त्या धोकादायक बनल्या होत्या. नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने या कमानी तातडीने उतरविण्याची मागणी करण्यात आली होती. यासंदर्भात महापालिका प्रशासनाकडे निवेदन देऊन आवश्यक कार्यवाही करण्याची विनंती करण्यात आली होती.

या पाठपुराव्याची दखल घेत कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने आज पंचगंगा स्मशानभूमी परिसरातील दोन्ही धोकादायक कमानी पूर्णपणे उतरविण्यात आल्या. त्यामुळे या ठिकाणी येणाऱ्या नागरिकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न मार्गी लागला आहे.

नागरिकांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने करण्यात आलेल्या या कार्यवाहीबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या पाठपुराव्याला यश मिळाले असून, महापालिका प्रशासनाने तातडीने कार्यवाही केल्याबद्दल भाजपा युवा मोर्चाच्या वतीने समाधान व्यक्त करण्यात आले आहे.

नागरिकांच्या प्रश्नांसाठी सातत्याने पाठपुरावा करून त्यांची सोडवणूक करण्यास भाजपा युवा मोर्चा कटिबद्ध आहे, असे भाजपा सचिव अमित शिंदे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes