SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मनुष्यजीवनाला मोल आहे! 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' आत्मपरीक्षण आणि जनजागृतीची नितांत गरजकोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला करवीरमध्ये तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रामंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदेएसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगलेयंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जाहिरात

 

गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकाल

schedule09 Sep 26 person by visibility 278 categoryउद्योग

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) पंचवार्षिक निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जाहीर झाला आहे. निवडणूक निर्णय अधिकारी मोसमी चौगुले यांनी पत्रकार परिषदेत ही घोषणा केली असून, येत्या १८ ऑक्टोबर रोजी मतदान तर १९ ऑक्टोबर रोजी मतमोजणी होणार आहे.

या निवडणुकीसाठी १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. अंतिम मतदार यादीचा घोळ अद्याप कायम असला, तरी निवडणुकीच्या निमित्ताने जिल्ह्यातील राजकीय आणि सहकार क्षेत्रातील हालचालींना प्रचंड वेग आला आहे.

◼️महत्त्वाच्या तारखांचे टप्पे
 * १५ ते २२ सप्टेंबर: उमेदवारी अर्ज दाखल करणे
 * २३ सप्टेंबर: अर्जाची छाननी
 * २५ सप्टेंबर ते ६ ऑक्टोबर: अर्ज माघार मुदत
 * ९ ऑक्टोबर: अंतिम उमेदवारी यादी प्रसिद्ध
 * १८ ऑक्टोबर: मतदान
 * १९ ऑक्टोबर: मतमोजणी व निकाल

यंदाच्या निवडणुकीत एकूण २५ संचालक निवडून येणार आहेत. यात सामान्य प्रवर्गातून २०, महिला २, अनुसूचित जाती-जमाती १, इतर मागासवर्गीय १ आणि भटक्या-विमुक्त जाती प्रवर्गातून १ प्रतिनिधीचा समावेश असेल. तसेच स्वीकृत प्रवर्गात तज्ञ आणि शासन नियुक्त संचालकांचा समावेश असणार आहे.

सहा ऑक्टोबर रोजी अंतिम यादी जाहीर झाल्यानंतर अवघ्या ११ दिवसांचा प्रचार काळ मिळणार असल्याने नेत्यांची धावपळ वाढली आहे. महायुतीमध्ये इच्छुकांची मोठी गर्दी असून जागावाटपाची अंतर्गत चुरस नेत्यांसाठी डोकेदुखी ठरणार आहे. काँग्रेस नेते आमदार सतेज पाटील यांची रणनीती आणि महायुतीची तयारी यामुळे ही निवडणूक अत्यंत अटीतटीची होणार हे निश्चित असून, संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes