SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
मनुष्यजीवनाला मोल आहे! 'जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिनानिमित्त' आत्मपरीक्षण आणि जनजागृतीची नितांत गरजकोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहनशक्तीपीठ महामार्गाच्या मोजणीला करवीरमध्ये तीव्र विरोध; शेतकऱ्यांचा आक्रमक पवित्रामंडप-पेंडॉलच्या तक्रारींसाठी तपासणी पथकांशी संपर्क साधा -दिपक शिंदेएसआयआर अंतर्गत मतदार यादीत पात्र मतदारांच्या समावेशासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक : मतदार यादी निरीक्षक शीतल तेली-उगलेयंदा सांगलीत रंगणार महाराष्ट्र राज्य निवड बुद्धिबळ स्पर्धा!!महापौर रुपाराणी निकम यांच्या जनता दरबारात 36 नागरिकांचे अर्ज दाखल; प्राप्त तक्रारी तातडीने निकाली काढण्याच्या संबंधित अधिकाऱ्यांना सूचनाडॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटलला ‘रोटरी’ कडून अत्याधुनिक नेफ्रोकेअर उपकरणे; ६३ लाखांचे वैदयकीय साहित्य प्रदान गोकुळ दूध संघाच्या निवडणुकीचा बिगुल वाजला; १८ ऑक्टोबरला मतदान, १९ ला निकालसंजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजनांच्या पेन्शनमध्ये वाढ करा; शिष्टमंडळाची निवासी जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

जाहिरात

 

कोल्हापूर : पंचगंगा स्मशानभूमीतील बेड उपलब्धतेसाठी रक्षाविसर्जन दुसऱ्याच दिवशी करण्याचे महापालिकेचे आवाहन

schedule09 Sep 26 person by visibility 241 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : शहरातील पंचगंगा, कदमवाडी, कसबा बावडा व बापट कॅम्प येथील चारही स्मशानभूमींमध्ये कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत नागरिकांना मोफत अंत्यविधीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यापैकी पंचगंगा स्मशानभूमीत मोठ्या प्रमाणात अंत्यविधी होत असल्याने येथे उपलब्ध असलेल्या बेडचा ताण वाढत आहे. पंचगंगा स्मशानभूमीत सध्या ३३ अंत्यविधी बेड उपलब्ध आहेत.

 अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर संबंधित नातेवाईकांकडून रक्षा विसर्जन करण्यास विलंब होत असल्याने अनेकदा दहन बेडवर रक्षा शिल्लक राहते. प्रामुख्याने बुधवार व रविवार या दिवशी रक्षा विसर्जन केले जात असल्याने इतर दिवशी संबंधित बेड उपलब्ध होत नाहीत. परिणामी त्या बेडवर पुढील अंत्यविधी करणे शक्य होत नसल्याने उपलब्ध बेडची संख्या कमी पडते.

 यामुळे पंचगंगा स्मशानभूमीत बेड उपलब्ध नसल्यास अंत्यविधीसाठी आलेले पार्थिव महापालिकेच्या अन्य स्मशानभूमीकडे पाठवावे लागते. 

त्यामुळे अंत्यविधीसाठी येणाऱ्या नागरिकांची गैरसोय होत आहे. ही बाब लक्षात घेता, अंत्यविधीची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी रक्षाविसर्जन करून महापालिकेस सहकार्य करावे असे आवाहन कोल्हापूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील सर्व नागरिकांना करण्यात आले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes