SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
विदर्भ, उत्तर महाराष्ट्रातील खारपाण पट्ट्याला ५.७८ लाख एकर सिंचन लाभ : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसशूरवीर जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञपूर्ण सन्मानकोल्हापूर उद्यम को-ऑप सोसायटीच्या अध्यक्षपदी माजी आमदार जयश्री जाधव, उपाध्यक्षपदी सुधाकर सुतार यांची निवडभविष्यात एसटीच्या नव्या बसेस हायब्रिड इंधनावर : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला राज्यातील सुरक्षा, सज्जतेचा आढावायश मिळवण्यासाठी कम्फर्ट झोन सोडा : डॉ. उदय साळुंखे; डी. वाय. पाटील स्कूल ऑफ इंजिनिअरिंग अँड मॅनेजमेंटमध्ये ‘टेक्नोलॉजिया’ उत्साहात कर्मवीर भाऊराव पाटील यांना स्मृतिदिनानिमित्त विद्यापीठात अभिवादनप्रा. जगन कराडे यांचा रविवारी सेवानिवृत्तीनिमित्त सत्कारकेंद्रीय कर्मचार्‍यांच्या मुलांसाठी कोल्हापुरात लवकरच केंद्रीय विद्यालय सुरू होणार, खासदार धनंजय महाडिक यांची माहितीजप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलाव

जाहिरात

 

शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलाची दिशा बुधवारी ठरणार

schedule02 May 25 person by visibility 282 categoryसामाजिक

कोल्हापूर :  नागपूर -गोवा प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधातील लढा आणखी तीव्र करण्यासाठी शेतकऱ्यांनी कंबर कसली असून या राज्यव्यापी आंदोलनाची पुढील दिशा ठरवण्यासाठी येत्या बुधवारी सायंकाळी ६ वाजता राज्यभरातील शेतकऱ्यांची ऑनलाईन बैठक घेण्यात येणार आहे. जिल्ह्यातील शक्तीपीठबाधित शेतकऱ्यांची बैठक शुक्रवारी काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या उपस्थितीत अजिंक्यतारा कार्यालयात झाली. यावेळी हा निर्णय घेण्यात आला. 

१२ जिल्ह्यातील बाधीत शेतकरी या बैठकीत सहभागी होणार असून आहेत. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील हे आंदोलन मोडीत काढण्यासाठी शासनाकडून पोलीस यंत्रणेमार्फत वारंवार दबाव सुरु आहे. याला तीव्र विरोध करण्याचा निर्धारही शेतकऱ्यांनी यावेळी केला.

 यावेळी उद्धवसेनेचे सहसंपर्कप्रमुख विजय देवणे, गोकुळ दुध संघाचे संचालक बाबासाहेब चौगले, प्रकाश पाटील, भुदरगड कॉंग्रेस नेते राहूल देसाई, सम्राट मोरे (गारगोटी) , सुयोग वाडकर, कृष्णात पाटील (साजणी), संपत देसाई, युवराज शेटे (माणगाव), शिवाजी पाटील ( खेबवडे), आनंदा पाटील ( एंकोडी), युवराज पाटील ( कणेरी), तानाजी भोसले (कणेरीवाडी) , शिवाजी कांबळे( निमशिरगाव) , एस. एन. पाटील, संग्राम पडोणकर आदी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes