जप्त केलेल्या स्थावर संपत्तीचा जाहीर लिलाव
schedule09 May 25 person by visibility 170 categoryराज्य

कोल्हापूर : बाबुराव लक्ष्मण दिंडे व प्रतिक बाबुराव दिंडे, रा. उजळाईवाडी, ता. करवीर यांच्याकडून एकूण रु. ७,५०,०००/- (रुपये साडेसात लाख) इतकी रक्कम वसूल करण्यासाठी टाटा हिताची EX110 पोकलँड हे यंत्र जप्त करण्यात आले आहे.
ही थकबाकी निश्चित केलेल्या तारखेपूर्वी, म्हणजेच १५ मे २०२५ पूर्वी भरली नाही, तर सदर जप्त मालमत्ता टाटा हिताची EX110 पोकलँड तहसिलदार कार्यालय, करवीर, कोल्हापूर येथे दिनांक १५ मे २०२५ रोजी सकाळी ११ वाजता किंवा दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास जाहीर लिलावाने विक्रीस काढण्यात येईल, अशी माहिती करवीरचे तहसिलदार स्वप्निल रावडे यांनी दिली आहे.
टाटा हिताची EX110 पोकलँड यंत्राची मूल्यांकन किंमत रुपये १०,००,०००/- (रुपये दहा लाख) इतकी निश्चित करण्यात आली असून यापेक्षा कमी बोली स्वीकारली जाणार नाही.