शूरवीर जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञपूर्ण सन्मान
schedule10 May 25 person by visibility 166 categoryसामाजिक

कोल्हापूर : सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या कुटुंबीयांचा कृतज्ञपूर्ण सन्मान शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर आणि डॉक्टर श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने आज करण्यात आला. कुटुंबियांचा सन्मान करून त्यांना धीर देण्याबरोबरच त्यांच्या पाठीशी शिवसेना परिवार असल्याचे अभिवचनही यावेळी देण्यात आले.
संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे पश्चिम महाराष्ट्र संपर्कप्रमुख प्रशांत साळुंखे व निवृत्त सुभेदार मेजर बंडू कात्रे यांच्या हस्ते सन्मानपत्र, शाल, श्रीफळ देऊन कुटुंबीयांचा कृतज्ञपूर्ण सन्मान करण्यात आला.
गिरगाव, ता. करवीर येथील जवानांच्या कुटुंबीयांचा सन्मान करण्यात आला.
सीमेवर अहोरात्र देशासाठी अनेक जवान लढत आहेत. ते सीमेवर आहेत म्हणून संपूर्ण देश सुरक्षित आहे. अशा या जवानांच्या कुटुंबीयांना धीर देण्याबरोबरच कृतज्ञपूर्ण सन्माने त्यांना गहिवरून आले. आमच्या पाठीशी सर्व जनता उभी आहे, आम्हालाही याबद्दल खूप मोठा आधार असल्याचे भावना कुटुंबीयांनी व्यक्त केल्या.
यावेळी प्रशांत साळुंखे यांनी जवानांच्या कुटुंबाला धीर देत जवान सीमेवर लढत असल्यामुळे आपण देशात सुरक्षित असल्याची भावना व्यक्त करत कृतज्ञता व्यक्त करून उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आपल्या पाठीशी आहेत, असे सांगितले. कुटुंबातील व्यक्तींनीही एकनाथ शिंदे साहेब यांच्या कार्याचे कौतुक करून सदर सन्मानाबद्दल आभार व्यक्त केले.
यावेळी शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष कोल्हापूर जिल्हाप्रमुख विनायक जरांडे, गगनबावडा तालुकाप्रमुख ओंकार पाटील उपस्थित होते.