SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मोफत केएमटी पास वितरण: केएमसी कॉलेजच्या प्र. प्राचार्यांकडून परिवहन विभागाची दिलगीर व्यक्त!राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्त

जाहिरात

 

कोल्हापूर : मोफत केएमटी पास वितरण: केएमसी कॉलेजच्या प्र. प्राचार्यांकडून परिवहन विभागाची दिलगीर व्यक्त!

schedule31 Oct 26 person by visibility 186 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या माध्यमातून यशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) महाविद्यालयातील अकरावी व बारावीच्या ४७ विद्यार्थ्यांना केएमटी बसचा मोफत प्रवास पास देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, या योजनेला केएमटीच्या परिवहन समितीची अंतिम मान्यता मिळालेली नसताना व निमंत्रण पत्रिकेत परिवहन समितीच्या सभापती आणि पदाधिकाऱ्यांची नावे वगळण्यात आल्याने महापालिकेच्या विभागांमधील समन्वयाचा अभाव उघड झाला होता.
या सर्व प्रकारानंतर केएमसी कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यांनी व्हिडिओच्या माध्यमातून घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त केली आहे.

🟣 प्र.  प्राचार्यांच्या भूमिकेतील प्रमुख मुद्दे:
 ◼️ अनावधानाने घडलेली चूक: काल महाविद्यालयातील कनिष्ठ विभागातील विद्यार्थिनींच्या मोफत पास वितरण समारंभात अनवधानाने परिवहन सभापती  सत्यजित चंद्रकांत जाधव  आणि परिवहन समिती सदस्यांची नावे निमंत्रण पत्रिकेत व कार्यक्रमात नमूद करायची राहून गेली, असे प्राचार्यांनी स्पष्ट केले.

 ◼️ दिलगिरी व माफी: या चुकीबद्दल महाविद्यालयाच्या प्राचार्यांनी परिवहन विभागाची आणि संबंधित पदाधिकारांची दिलगिरी व्यक्त केली आहे.
 ◼️ पुढील दक्षता: भविष्यात अशा पद्धतीची कोणतीही चूक होणार नाही, याची पूर्ण दक्षता घेतली जाईल अशी हमी त्यांनी दिली आहे.
 ◼️ सहकार्याची अपेक्षा: माननीय सभापती आणि परिवहन समितीचे सदस्य याबद्दल क्षमशील ठरतील आणि यापुढील काळात मार्गदर्शन व सहकार्य करतील, अशी अपेक्षा प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes