SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापूर : मोफत केएमटी पास वितरण: केएमसी कॉलेजच्या प्र. प्राचार्यांकडून परिवहन विभागाची दिलगीर व्यक्त!राष्ट्रीय एकात्मतेचे शिल्पकार सरदार वल्लभभाई पटेल!भारतीय क्रिकेटचे पितामह: कर्नल सी. के. नायडूराष्ट्रीय फेरीवाला धोरण राबवा! कोल्हापुरात महापालिकेवर फेरीवाल्यांचा धडक मोर्चा; मनपाच्या मनमानी कारभाराविरोधात संतापशशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टातशासकीय जमिनीवरील निवासी अतिक्रमणे नियमानुकूल करण्याची प्रक्रिया सुरूयशवंतराव चव्हाण (के.एम.सी.) कॉलेजमधील विद्यार्थिनींना के.एम.टी.चा मोफत पास‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळीची गोड भेट !, दूध संस्थांच्या खात्यावर दर फरकापोटी ११७ कोटी ४२ लाख रुपये जमा !अकिवाट येथील आरोग्य शिबिरात ६६७ नागरिकांची तपासणीकोल्हापूर महापालिकेचा भोंगळ कारभार उघडा! परिवहन समितीला डावलून 'पास वाटपाचा' बनाव; ४७ विद्यार्थी त्रस्त

जाहिरात

 

शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड वैध ठरवा; समविचारी आघाडी हायकोर्टात

schedule30 Oct 26 person by visibility 344 categoryउद्योग

कोल्हापूर : गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांची निवड केली असून ही निवड वैध ठरवावी अशी याचिका समविचारी आघाडीने शुक्रवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये केली. या दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर  न्यायमूर्ती अभय आहुजा व न्यायमूर्ती नीरज धोटे यांच्या खंडपिठासमोर शुक्रवारी सुनावणी झाली.  या सुनावणीदरम्यान कोर्टाने नियमानुसार निकालानंतर १५ दिवसांच्या आत, म्हणजेच ३ नोव्हेंबरपर्यंत चेअरमन निवड पूर्ण होणे आवश्यक असल्याचे स्पष्ट करत विरोधी 12 संचालकांना 2 नोव्हेंबर रोजी कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. या प्रकरणाची पुढील सुनावणी आता २ नोव्हेंबर रोजी होणार आहे.
​सुनावणीदरम्यान हायकोर्टाने महायुतीच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित केले. चेअरमन निवडीच्या बैठकीला महायुतीचे १२ संचालक अनुपस्थित का राहिले? असा सवाल करत कोर्टाने उद्याच चेअरमन निवडीची प्रक्रिया का राबवण्यात येऊ नये? अशी विचारणा केली.

गोकुळ दूध संघाच्या अध्यक्षपदी समविचारी आघाडीने शशिकांत पाटील चुयेकर यांची गुरुवारी निवड केली. मात्र, निवडीसाठी विरोधी आघाडीचे संचालक अनुपस्थित राहिल्याने निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी निवड सभा तहकूब केली होती. त्यामुळे समविचारी आघाडीने गोकुळचे अध्यक्ष शशिकांत पाटील चुयेकर यांच्यासह 13 संचालकांच्या वतीने ॲड. धैर्यशील पवार यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्किट बेंचमध्ये शुक्रवारी याचिका दाखल केली. यावर सुनावणी झाली. याचिका कर्त्यांच्यावतीने ॲड. आशुतोष कुंभकोणी यांनी न्यायालयात बाजू मांडली. यावेळी ॲड. श्रीकृष्ण गणबावले उपस्थित होते.

​महायुतीचे संचालक चेतन नरके यांच्या वकिलांनी कोर्टात बाजू मांडताना सांगितले की, आम्हाला आमची बाजू व म्हणणे मांडण्याची पूर्ण संधी देण्यात यावी त्यानंतरच यावर अंतिम निर्णय घेण्यात यावा. यावर कोर्टाने महायुतीच्या सर्व १२ संचालकांना २ नोव्हेंबर रोजी होणाऱ्या पुढील सुनावणीस कोर्टात प्रत्यक्ष उपस्थित राहण्याचे आदेश दिले आहेत.

दरम्यान, न्यायालयाने स्पष्ट केले आहे की, या याचिकेच्या अंतिम निकालाच्या अधीन राहूनच पुढील सर्व प्रक्रिया व निर्णय वैध ठरतील. त्यामुळे कोर्टाच्या या भूमिकेमुळे आणि चेअरमनपद निश्चित होईपर्यंत अशासकीय सदस्यांच्या निवडीला पूर्णपणे ब्रेक लागला आहे. आता २ नोव्हेंबरच्या सुनावणीकडे संपूर्ण जिल्ह्याचे आणि राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes