SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
इचलकरंजी: 'केन चेस सॉल्व्हिंग कप'मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा डंका; ६ बालचमूंनी मारली बाजीसमकालीन प्रश्नांच्या संदर्भात महात्मा फुलेंचा विचार उपयुक्त : डॉ. अभय टिळक टपाल विभागाच्या निवृत्तीवेतनधारकांसाठी ६ नोव्हेंबर रोजी पेंशन अदालतपन्हाळा महसूल लोक अदालतीत ३० प्रकरणांमध्ये तडजोड; १४२ खातेदारांना लाभपुणे शिक्षक मतदारसंघात भाजपचा झेंडा! कौस्तुभ गावडे यांचा मोठा विजय; कोल्हापुरात गुलाल उधळत जल्लोषकोजागिरीच्या चांदण्यात रंगली 'कलासक्त'ची सुरमई मैफील; समाजभूषण किशोर घाटगे यांचा महापौर रूपाराणी निकम यांच्या हस्ते सत्कारतेरवाड येथील आरोग्य शिबिरात २४६ नागरिकांची तपासणीपर्यावरणीय समतोल राखणे गरजेचे: उद्योजिका मोनिका मोहिते यांचे प्रतिपादन; किर्लोस्कर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२६ उद्घाटनदुष्काळग्रस्त ३०४ तालुक्यातील शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी पाच हजार रुपयांचा अग्रिम मिळणारआंतरराष्ट्रीय ॲनिमेशन दिन: कल्पकतेला आणि मनोरंजनाला सलाम

जाहिरात

 

इचलकरंजी: 'केन चेस सॉल्व्हिंग कप'मध्ये कोल्हापूर जिल्ह्याचा डंका; ६ बालचमूंनी मारली बाजी

schedule28 Oct 26 person by visibility 146 categoryक्रीडा

इचलकरंजी  : वर्ल्ड फेडरेशन फॉर चेस कंपोझिशन (WFCC), चेसबेस इंडिया, केन चेस अकादमी आणि लायन्स क्लब ऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दुसऱ्या 'केन चेस सॉल्व्हिंग कप' स्पर्धेत कोल्हापूर जिल्ह्याच्या बुद्धिबळपटूंनी अभूतपूर्व यश संपादन केले आहे. स्थानिक पातळीवर दाते मळा येथील कै. बाळासाहेब दाते ब्लड सेंटरमध्ये झालेल्या या स्पर्धेत जिल्ह्यामधून एकूण १० पारितोषिके पटकावण्यात आली असून, यामध्ये इचलकरंजीच्या बुद्धिबळ क्षेत्राची नवी ओळख पुन्हा एकदा राज्यस्तरावर अधोरेखित झाली आहे.

या स्पर्धेत इचलकरंजी, कोल्हापूर आणि सांगली परिसरातील एकूण २९ प्रतिभावान खेळाडूंनी सहभाग घेतला होता. विशेषतः मुलींचा उत्स्फूर्त सहभाग लक्षणीय ठरला. यामध्ये अवघ्या ७ वर्षांच्या कबनूरचा श्रेयश पांडव आणि इचलकरंजीची मुद्रा पाटील या चिमुरड्या खेळाडूंनी उपस्थितांचे विशेष वेधले आणि आगामी भविष्यासाठी आशादायक चित्र निर्माण केले.

◼️विजेत्या खेळाडूंची अंतिम यादी
▪️श्रेणी १ (Category 1)
 * संयुक्त प्रथम क्रमांक: तन्मय पवार व अथर्व तावरे (इचलकरंजी)
 * तृतीय क्रमांक: सिद्धेश वड्डे (इचलकरंजी)
 * चौथा व पाचवा क्रमांक: आभाष पाटील आणि अभिषु पाटील (जयसिंगपूर) - संयुक्त
▪️श्रेणी २ (Category 2 - १२ वर्षांखालील गट)
 * प्रथम क्रमांक: अवनीश जितकर (कोल्हापूर)
 * द्वितीय ते पाचवा क्रमांक (संयुक्त): नेहा हतलगे (जयसिंगपूर), समृद्धी खटोड, हर्ष मादनाईक आणि शिवांश सुतार (सर्व रा. इचलकरंजी)

सर्व विजयी खेळाडूंना वर्ल्ड फेडरेशन फॉर चेस कंपोझिशनचे (WFCC) अध्यक्ष मारियन कोव्हासेविच आणि इव्हेंट डायरेक्टर शतानिक मुखुटी यांच्या स्वाक्षरीचे विशेष प्रमाणपत्र प्रदान करून गौरविण्यात आले.
या यशस्वी आयोजनाबद्दल आणि खेळाडूंच्या चमकदार कामगिरीबद्दल वरिष्ठ राष्ट्रीय पंच रोहित पोळ (केन चेस अकादमी, इचलकरंजी व जयसिंगपूर) तसेच लायन्स क्लब ऑफ इचलकरंजीचे कृष्णावतार भराडिया, अध्यक्षा रेखा सारडा, सचिव श्रद्धा सातपुते आणि कोषाध्यक्ष सुनिता अग्रवाल यांनी सर्व विजेत्यांचे मनःपूर्वक अभिनंदन केले असून, आगामी स्पर्धांसाठी त्यांना उज्ज्वल भविष्याच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes