राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष अंतर्गत मंगळवारी विविध पदांच्या परीक्षा
schedule05 Mar 25 person by visibility 640 categoryराज्य
कोल्हापूर : उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, कोल्हापूर अंतर्गत तालुका सेवादाता, कृषी व्यवस्थापक, पशु व्यवस्थापक व आदर्श प्रभागसंघ व्यवस्थापक अशा विविध पदांची परीक्षा घेण्यात येणार आहे. ही परीक्षा लेखी व मुलाखत पध्दतींचा अवलंब करुन घेण्यात येणार आहे.
यामध्ये कृषी व्यवस्थापक व पशु व्यवस्थापक यांची लेखी परीक्षा घेवून निवड केली जाणार आहे. परीक्षा संदर्भात उमेदवारांनी खालील बाबींचे पालन करणे आवश्यक आहे.
परीक्षा दि.11 मार्च 2025 रोजी सकाळी 11.00 ते 1.00 या वेळेत तंत्रज्ञान अधिविभाग शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर या ठिकाणी होणार आहे. संबधित परीक्षेकरिता उमेदवाराने परीक्षा केंद्रावर परीक्षेपूर्वी 1 तास अगोदर उपस्थित राहणे आवश्यक आहे. परीक्षेकरिता उमेदवारांना पोष्टाद्वारे प्रवेशपत्र पाठवले जाणार आहे. काही अपरिहार्य कारणास्तव एखाद्या उमेदवारास प्रवेशपत्र न मिळाल्यास जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा जिल्हा परिषद कोल्हापूर विभाग किंवा परीक्षा केंद्रावर प्रवेशपत्र उपलब्ध करून दिले जाणार आहे.
उमेदवाराने परीक्षेला येताना ओळखीचा पुरावा म्हणून आधारकार्ड, पॅनकार्ड, ड्रायव्हिंग लायसन, पासपोर्ट, निवडणूक ओळखपत्र सोबत आणणे बंधनकारक राहील. परीक्षा बहुपर्यायी स्वरुपाची असणार असून या परीक्षेचे वेळापत्रक, परीक्षेबाबत आवश्यक माहिती जिल्हा परिषदेच्या www.zpkolhapur.gov.in या संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.
परीक्षेसंदर्भात कोणत्याही अडचणी बाबत 0231-2655598, 9890612510 या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा परिषदेमार्फत करण्यात आले आहे.