माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते 25 लाखांच्या विकासकामांचा प्रारंभ
schedule12 Dec 25 person by visibility 144 categoryसामाजिक
कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिका क्षेत्रातील शिवाजी विद्यापीठ, तपोवन राजलक्ष्मी नगर या प्रभागांमध्ये २५ लाख रुपये निधीतून करण्यात येत असलेल्या विविध विकासकामांचा शुभारंभ कोल्हापूर दक्षिणचे माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्याहस्ते झाला.
खासदार इम्रान प्रतापगढी यांच्या निधीतून शिवाजी विद्यापीठ प्रभागातील प्रगती हौसिंग सोसायटी येथे ओपन स्पेसला कंपाऊंड बांधणे, तसेच तपोवन प्रभागातील सोमराज कॉम्प्लेक्स येथील ओपन स्पेसमध्ये विरंगुळा केंद्र बांधण्यासाठी प्रत्येकी 10 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याचबरोबर राजलक्ष्मीनगर प्रभागातील वसंतराव सरनाईक पार्क येथील अंतर्गत गटर्स करण्यासाठी महापालिकेकडून 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.
या तीनही कामांचा प्रारंभ माजी आमदार ऋतुराज पाटील यांच्या हस्ते झाला. यावेळी काँग्रेस शहराध्यक्ष सचिन चव्हाण, माजी नगरसेवक प्रवीण केसरकर, शोभा कवाळे, मधुकर रामाणे, दिपा मगदूम, दुर्वास कदम यांच्यासह सुयोग मगदूम, दिग्विजय मगदूम, सचिन शेंडे, सचिन काटकर, अशोक मुसळे, ॲड, सुनील धुमाळ, दत्तात्रय बामणे, डॉ. पाटील, आनंदराव साळोखे, सुजित नाईक, जयदीप सरनाईक, अनिल शिंदे, प्रदीप नलवडे, अमित कवाळे, इम्तियाज नाईकवडे, अशोक भोसले, विनायक पोवार, किशोर जाधव, सुभाष नाईक आदी उपस्थित होते.