SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
राजारामपूरी, सायबर चौक व एनसीसी भवन परिसरातील अनाधिकृत अतिक्रमणावर कारवाईचौथी आणि सातवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेकरीता नोंदणी आणि आवेदनपत्रासाठी १३ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढजिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढवण्याचे उद्दिष्ट; जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे प्रशासनाला निर्देशआंतरराष्ट्रीय हिंदी ऑलिंपियाडमध्ये संजय घोडावत इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय हिंदी प्रतिभा सन्मान एस.ए.ई. ई-बाहा स्पर्धेमध्ये ‘केआयटी’चा डंका; राष्ट्रीय स्तरावर केआयटीच्या विद्यार्थ्यांनी सिद्ध केली आपली तांत्रिक क्षमतामानवी जीवनात तंत्रज्ञानापेक्षा संवेदना महत्त्वाच्या: गजानन राजमानेडॉ. राजेश ख्यालप्पा यांना एफआयसीपी फेलोशिपशिवाजी विद्यापीठात अर्थसंकल्पावर विशेष परिसंवादनिवृत्तीवेतनधारक, कुटुंब निवृत्तीवेतनधारकांसाठी मुंबई येथे 58 वी पेन्शन अदालतमराठा दिननिमित्त ‘पर्वत ते सागर’ सायकल मोहिमेचे बुधवारी आयोजन

जाहिरात

 

साळोखे नगर येथे पिरॅमल स्वास्थ फाउंडेशन व स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार हेल्थ डॉक केंद्राचे उद्‌घाटन

schedule06 Dec 25 person by visibility 362 categoryआरोग्य

कोल्हापूर : साळोखे नगर येथे पिरॅमल स्वास्थ फाउंडेशन व स्टार हेल्थ इन्शुरन्स यांच्या संयुक्त विद्यमाने स्टार हेल्थ डॉक केंद्राचे उद्‌घाटन आज शनिवारी सहा डिसेंबर रोजी उत्साहात पार पडले. केंद्राचे उद्घाटन तालुका आरोग्य अधिकारी उत्तम मदने यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पिरॅमल स्वास्थ फाउंडेशनचे यशवंत ठाकरे (स्टार इन्शुरन्स) यांची प्रमुख उपस्थिती होती.

या केंद्रात रुग्णांना डॉक्टरांचा सल्ला,  मधुमेह, उच्च रक्तदाब, सामान्य बालरोग, दमा, रक्ताची आणि लघवीची साखरेसाठी तपासणी, ताप, खोकला आणि सर्दी, अतिसार, गर्भधारणा चाचणी, किरकोळ आजार, हिमोग्लोबिन चाचणी, आदी वैद्यकीय सेवा केवळ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच काटेकोरपणे प्रदान केल्या जाणारआहेत.

सर्व तपासण्या वैद्यकीय सल्ला व औषधे पूर्णपणे मोफत देण्यात येणार आहेत या प्रकल्पात डॉ. आदित्य दुबे,  रागिणी ननावरे,  वैष्णवी चौगुले, अस्मिता पाटील, प्रकल्प समन्वयक सुनील मोरे हे काम पाहत आहे. सुट्ट्या वगळता क्लिनिक सकाळी साडेनऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत सुरू होणार आहे. याचा परिसरातील नागरिकांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्राद्वारे करण्यात आले आहे. तसेच या कार्यक्रमात समाजसेवक, परिसरातील नागरिक उपस्थित होते.

 

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes