SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभसौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी कराकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 71 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईकायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर शासन जबाबदार : आ. सतेज पाटीलकोल्हापूर : सीपीआरमधील औषधांचा तुटवडा आणि नूतनीकरण घोटाळ्याविरोधात बाळासाहेब बेलेकर आक्रमक, उपोषणाचा इशारादुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदनशाही दसरा महोत्सव: महिलांच्या बाईक रॅलीतून दिला सामाजिक संदेश'टाटा पॉवर' मध्ये येथील नामांकित केआयटीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची घवघवीत निवड​"कळंब्यात मध्यरात्री बिबट्याचा वावर; मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!"

जाहिरात

 

शाही दसरा महोत्सव: महिलांच्या बाईक रॅलीतून दिला सामाजिक संदेश

schedule15 Oct 26 person by visibility 206 categoryराज्य

• विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी सहभागी

कोल्हापूर : शाही दसरा महोत्सवा अंतर्गत जिल्हा प्रशासनाच्या वतीने विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचाऱ्यांची रॅली पार पडली. या रॅलीमध्ये महसूल, पोलीस, आरोग्य, माहिती व जनसंपर्क आदी विविध विभागातील महिला अधिकारी, कर्मचारी पारंपरिक वेशात सहभागी झाल्या होत्या. रॅली ची सुरुवात जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सरिता थोरात यांच्या हस्ते करण्यात आली. यावेळी सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील, नायब तहसीलदार नम्रता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक हेमा पाटील, ॲड. गौरी पाटील, संयोजन समितीचे प्रमोद पाटील, उदय गायकवाड आदी उपस्थित होते.

जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या रॅलीचा मार्ग दसरा चौक - बिंदू चौक - उमा टॉकीज- बागल चौक -टाकाळा -  टेंबलाई चौक -कावळा नाका - दाभोळकर कॉर्नर- शाहूपुरी पोलीस स्टेशन - रेल्वे स्टेशन- व्हीनस कॉर्नर मार्गे पुन्हा दसरा चौक असा होता. पाण्याचा वापर जपून करा, पाणी वाचवा, मुलगी वाचवा, हेल्मेट वापरा, व्यसन करुन गाडी चालवू नका, ट्रिपल सीट घेवू नका, वेगाने वाहन चालवू नका, सोशल मीडियापासून मुलींनी सावध राहा, कोणत्याही आमिषाला बळी पडू नका, आई-बाबांचा आदर करा, सायबर फसवणुकीपासून सावध राहा, मोबाईलचा वापर कमीत कमी करा असे सामाजिक संदेश रॅलीतून देण्यात आले. 

राज्यातील दुष्काळ परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर यावर्षी साधेपणाने दसरा महोत्सव साजरा होत असून आज झालेल्या महिलांच्या रॅलीमध्ये विभागीय माहिती कार्यालयाच्या सहायक संचालक (माहिती) वृषाली पाटील, नायब तहसीलदार नम्रता चौगुले, पोलीस उपनिरीक्षक हेमा पाटील यांच्यासह सुमारे शंभर महिला सहभागी झाल्या. यावेळी त्यांनी दिलेल्या सामाजिक संदेशांच्या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes