SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
गांधीनगरमध्ये टायर पेटवून रिपब्लिकन पक्षाचा जोरदार ‘रास्ता रोको’!पोस्ट ऑफिसमधून दिवाळीचा फराळ परदेशात पाठविणे आता अधिक सुलभसौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी कराकोल्हापूर : शहर पाणी पुरवठा विभागाच्यावतीने 71 थकबाकीदार कनेक्शन धारकांवर कारवाईकायदा आणि सुव्यवस्था बिघडली तर शासन जबाबदार : आ. सतेज पाटीलकोल्हापूर : सीपीआरमधील औषधांचा तुटवडा आणि नूतनीकरण घोटाळ्याविरोधात बाळासाहेब बेलेकर आक्रमक, उपोषणाचा इशारादुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य केल्याबद्दल भाजपा जिल्हाध्यक्ष विजय जाधव यांनी केले देवाभाऊंचे अभिनंदनशाही दसरा महोत्सव: महिलांच्या बाईक रॅलीतून दिला सामाजिक संदेश'टाटा पॉवर' मध्ये येथील नामांकित केआयटीच्या तब्बल २६ विद्यार्थ्यांची घवघवीत निवड​"कळंब्यात मध्यरात्री बिबट्याचा वावर; मुख्य रस्त्यावर बिबट्या दिसल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण!"

जाहिरात

 

सौदत्ती येथे गोकुळच्या ठरावधारकांना शपथ देऊन दबाव आणण्याच्या प्रकाराची चौकशी करा

schedule15 Oct 26 person by visibility 315 categoryसामाजिक

◼️बेळगावच्या जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांकडे निवेदनाद्वारे मागणी

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ) संचालक मंडळाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठरावधारक मतदारांना सौंदत्ती येथील देवीच्या भंडाऱ्यावर हात ठेवून शपथ देण्याच्या माध्यमातून भयभीत करून मतदानावर प्रभाव टाकला जाण्याची शक्यता आहे.  या प्रकाराची तातडीने चौकशी करून आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी प्राचार्य डॉ. आनंद मेनसे, सीमा पाटील, माजी महापौर ॲड. नागेश सातेरी, राजेश वरक, ईश्वर गायकवाड, ॲड. अभिषेक मिठारी यांनी बेळगावचे जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी आणि पोलीस अधीक्षक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

कर्नाटकातील बेळगाव जिल्ह्यातील सौंदत्ती रोड येथील निकम कल्याण मंडपम येथे १६ ऑक्टोबर रोजी गोकुळच्या निवडणुकीशी संबंधित ठरावधारक मतदारांना बोलावून शपथ देण्याचा कार्यक्रम आयोजित केला जाणार असल्याची माहिती निवेदनात देण्यात आली आहे. या कार्यक्रमाच्या माध्यमातून विशिष्ट उमेदवार किंवा पॅनेलच्या बाजूने मतदान करण्यासाठी मतदारांवर दबाव आणला जाण्याची शक्यता व्यक्त आहे. तसेच शपथ घेण्यास नकार देणाऱ्या मतदारांना मानसिक दबाव किंवा धमकी दिली जाण्याची शक्यताही निवेदनात नमूद करण्यात आली आहे.

या प्रकरणाची कर्नाटक राज्यातील अमानवी व दुष्ट प्रथा आणि काळी जादू प्रतिबंधक कायदा, २०१७ तसेच भारतीय न्याय संहितेतील लागू तरतुदींच्या अनुषंगाने तपासणी करण्याची मागणी  करण्यात आली आहे.

संबंधित कार्यक्रमाची सत्यता पडताळून आयोजकांकडून त्याचे स्वरूप व उद्देश यांची माहिती घ्यावी. मतदारांना विशिष्ट उमेदवाराच्या बाजूने मतदान करण्यासाठी धमकी, दबाव किंवा जबरदस्ती केली जात असल्याचे आढळल्यास कायद्यानुसार कारवाई करावी. तसेच उपलब्ध सीसीटीव्ही चित्रण, निमंत्रणे, संदेश आणि अन्य पुरावे सुरक्षित ठेवण्यासाठी आवश्यक पावले उचलावीत, अशी मागणीही निवेदनात करण्यात आली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes