प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात
schedule19 Feb 26 person by visibility 111 categoryसामाजिक
कोल्हापूर : प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात शिवप्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने झाली.
प्रमुख वक्त्या सुखदा कुलकर्णी यांनी शिवचरित्रावर प्रभावी भाषण करताना शिवाजी महाराजांच्या जन्म, बालसंस्कार, स्वराज्य स्थापनेचा संकल्प, गनिमी काव्याची युद्धनीती, तसेच आदर्श शासनव्यवस्थेची माहिती विद्यार्थिनींना दिली. शिवनेरी किल्ल्यावर झालेला त्यांचा जन्म, जिजाबाईंचे संस्कार आणि अफझल खानावर मिळवलेला पराक्रम यांचा उल्लेख करून त्यांनी विद्यार्थिनी , शिक्षकसमूहाला प्रेरित केले.
कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान मुख्याध्यापिका सविता पाटील यांनी भूषविले. त्यांनीदेखील आपल्या अध्यक्षीय मनोगतातून शिवाजी महाराजांच्या शौर्य, दूरदृष्टी आणि नेतृत्वगुणांचे महत्त्व अधोरेखित करत विद्यार्थिनींना त्यांच्या विचारांचा आदर्श घेण्याचे आवाहन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विद्या मंडलिक यांनी केले, तर आभार समिधा गोणी यांनी मानले. यावेळी पर्यवेक्षिका अंजली आंबर्डेकर तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विद्यार्थिनींच्या उत्स्फूर्त सहभागामुळे कार्यक्रमाला विशेष रंगत आली.