SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
प्रिन्सेस पद्माराजे गर्ल्स हायस्कूलमध्ये शिवजयंती उत्साहात डी वाय पाटील विद्यापीठात शिवजयंती उत्साहात साजरी; मेडिकल कॉलेज स्टूडेंट कौन्सिल कडून आयोजन, पालखी, लेझीमच्या तालावर वातावरण शिवमयडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रमडॉ. संजय डी पाटील यांच्या वाढदिवसा निमित्त डी वाय पाटील अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांकडून सामाजिक उपक्रमराजर्षी शाहू छत्रपती जन्मस्थळ संग्रहालयाचा 21 फेब्रुवारी रोजी लोकार्पण सोहळाकिल्ले पन्हाळगडावर 'जय भवानी, जय शिवाजी'चा जयघोषशिवाजी विद्यापीठात तबला वादन कार्यशाळा; तालशास्त्रातील बारकावे आणि एकल वादनाने विद्यार्थी मंत्रमुग्धडी. वाय. पाटील हॉस्पिटल, अभियांत्रिकी प्रेसिडेंट कप क्रिकेट स्पर्धेचे विजेते‘गोकुळ’ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...कोल्हापूर महापालिकेच्यावतीने छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन

जाहिरात

 

‘गोकुळ’ मार्फत छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन...

schedule19 Feb 26 person by visibility 151 categoryसामाजिक

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्‍या वतीने संघाच्‍या  ताराबाई पार्क कार्यालय येथील कार्यालयात महाराष्ट्र राज्याचे आराध्य दैवत हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९६ वी जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या पुतळ्याचे पुजन व पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमास संचालक मंडळ, अधिकारी व कर्मचारी उपस्थितीत होते.

   यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, भारताच्या इतिहासातील शौर्य आणि  संघटन कौशल्याचे प्रतिक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. हिंदवी स्वराजाची स्थापना करून त्यांनी न्याय, सत्य आणि सर्व धर्मसमभावाचा आदर्श घालून दिला. त्यांची युद्धनीती, दूरदृष्टी आणि सक्षम प्रशासन पद्धती आज हि प्रेरणादायी आहे. सामान्य जनतेच्या कल्याणासाठी असलेली त्यांची बांधिलकी आम्हाला प्रेरणा देणारे असल्याचे मनोगत त्यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमाप्रसंगी संघाचे ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके यांनी मनोगत व्यक्त केली तर कार्यक्रमाचे स्वागत प्रास्ताविक महिला विकास अधिकारी मृण्मयी सातवेकर यांनी केले.तर आभार जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील यांनी केले.

यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक अजित नरके, अंबरिषसिंह घाटगे, कर्णसिंह गायकवाड, प्रकाश पाटील, संभाजी पाटील, भोगावती शिक्षण प्रसारक मंडळ संचालक अभिषेक डोंगळे, गोकुळचे पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, संकलन व्‍यवस्‍थापक दत्तात्रय वागरे, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.विजय मगरे, अशोक पुणेकर, विनोद वानखेडे, गीता मोरे, संभाजी जाधव व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes