SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
दुचाकी वाहनांची नवी नोंदणी मालिका 23 जूनपासून सुरुडी. वाय. पाटील अभियांत्रिकीचा ४ दशकांचा प्रवास अभिमानास्पद : डॉ. संजय डी. पाटील यांचे प्रतिपादन, ४१ वा वर्धापन दिन उत्साहातसंजय घोडावत इन्स्टिट्यूटमध्ये वृक्षारोपणडीकेटीईच्या विद्यार्थ्यांचा इटली येथे ‘इटालियन टेक्नॉलॉजी ऍवॉर्ड’ ने सन्मानठाणे, मुंबई उपनगर, मुंबई शहर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग सागरी किनारपट्टीसाठी उच्च लाटांचा इशाराकोल्हापूर शहरातील हॉटेल व्यावसायिकांचा रोजचा कचरा उठाव करावा; कर्तृत्व संस्थेतर्फे प्रशासक के. मंजूलक्ष्मी याना निवेदनदूध भेसळ रोखण्यासाठी लवकरच नवा कायदा : मंत्री अतुल सावेमोफत उच्च शिक्षण योजनेची प्रभावी अंमलबजावणी करा उच्च व तंत्र शिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांचे निर्देशकोल्हापूर जिल्ह्यातील दुर्दैवी घटना : विजेचा शॉक देऊन 11 वर्षाच्या मुलाचा खून; पोलिसांनी अल्पवयीन मुलाला घेतले ताब्यातमराठी भाषा अनिवार्य; हिंदीसह इतर भारतीय भाषा ऐच्छिक : शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे

जाहिरात

 

दूरशिक्षण केंद्राच्या एम.बी.ए.मधील विद्यार्थ्यांची विविध कंपन्यांत निवड

schedule18 Jun 25 person by visibility 185 categoryराज्य

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्राच्या एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) मध्ये शिक्षण घेणाऱ्या चार विद्यार्थ्यांची विविध महत्त्वाच्या कंपन्यांत निवड झाली आहे.

शिवाजी विद्यापीठाच्या रोजगार कक्षातर्फे कॅम्पस भरती शिबीर आयोजित करण्यात आले. त्यामध्ये विविध कंपन्या सहभागी झाल्या. विद्यापीठाच्या दूरशिक्षण व ऑनलाईन शिक्षण केंद्रामध्ये एमबीए (डिस्टन्स मोड) शिकणाऱ्या प्रीतेश महावीर कंठी आणि तेजल महेश पाटोळे या दोन विद्यार्थ्यांची मुथूट फायनान्स या नामांकित कंपनीमध्ये अनुक्रमे ज्युनिअर रिलेशनशिप एक्झिक्युटिव्ह आणि कस्टमर केअर एक्झिक्युटिव्ह म्हणून निवड झाली. तसेच, ओंकार पाटील यांची अदानी समूहात सेल्स ट्रेनी म्हणून आणि सृष्टी मोरे यांची पुण्याच्या अक्वा चिल सिस्टिम्स इंडिया प्रायव्हेट लिमिटेडमध्ये एच. आर./ मार्केटिंग इंटर्न म्हणून निवड झाली आहे.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे दूरशिक्षण केंद्र संचालक डॉ. के. बी. पाटील यांनी अभिनंदन केले. ते  म्हणाले, या विद्यार्थ्यांची निवड ही  दूरशिक्षण व ऑनलाईन  शिक्षण केंद्राच्या  एम.बी.ए. (डिस्टन्स मोड) अभ्यासक्रमाच्या यशस्वितेचा आणि विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उघडलेल्या संधीचा एक उल्लेखनीय टप्पा आहे.

विद्यापीठाच्या या एम.बी.ए. (दूरशिक्षण) अभ्यासक्रमासाठी विद्यापीठ अनुदान आयोग आणि अखिल भारतीय तंत्रज्ञान शिक्षण परिषद यांची मान्यता आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना मार्केटिंग, मानवी संसाधन व्यवस्थापन, ऑपरेशन आणि प्रोडक्शन व्यवस्थापन तसेच वित्तीय व्यवस्थापन या विषयांत एम.बी.ए.चे शिक्षण घेणे शक्य झाले आहे.

जाहिरात

 
Copyright © 2025. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes