SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
कोल्हापुरात १ कोटी ९५ लाखांची गोव्यातील अवैध दारू जप्त; स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची मोठी कारवाईसहकार उपनिबंधकांकडून अवसायनातील २९८ दूध संस्थाही मतदानास पात्रडी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवडकोल्हापूर : रंकाळा परिसरातील अनधिकृत हातगाडयांविरोधात व्यापक मोहीम ; विभागांनी समन्वयाने कारवाई करावी : आयुक्त डॉ. राजेंद्र भारुडकेडीसीसी कर्मचाऱ्यांना वेतनवाढ फरकाचा तिसरा हप्ता वर्ग; गणेश चतुर्थीच्या पार्श्वभूमीवर कर्मचाऱ्यात उत्साह आणि आनंद येत्या महिन्याभरात विविध मंत्र्याकडे बैठका लावणार : मंत्री हसन मुश्रीफशिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. राजनीश कामत यांना लोकशिक्षक बाबा भारती जीवन गौरव पुरस्कार जाहीरइचलकरंजी: स्वातंत्र्यदिनानिमित्त 'केन चेस अकॅडमी'तर्फे भव्य मोफत बुद्धिबळ कॅम्प उत्साहात अभियंत्यांच्या योगदानातून साकारेल आत्मनिर्भर भारत : मेजर अभिजीत ताम्हणकर; केआयटी महाविद्यालयात स्वातंत्र्य दिन उत्साहात स्वातंत्र्यदिनासोबत रगडियन जिमचा चौथा वर्धापनदिन उत्साहात; रामकृष्ण हॉलमध्ये रंगला दिमाखदार सोहळा

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठाच्या चार विद्यार्थ्यांची तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्रामसाठी निवड

schedule17 Aug 26 person by visibility 201 categoryशैक्षणिक

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ, कोल्हापूरच्या सेंटर फॉर इंटरडिसिप्लिनरी रिसर्च मधील चार पीएच.डी. संशोधक विद्यार्थ्यांची ‘तैवान एक्स्पिरियन्स एज्युकेशन प्रोग्राम’ या आंतरराष्ट्रीय संशोधन कार्यक्रमासाठी निवड झाली आहे. 

निवड झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सुमिता सु. पाटील, गणेश ध. जाधव, शिवप्रसाद कृ. जाधव आणि ऋषिकेश सं. गुरव यांचा समावेश आहे.  जगभरातील संशोधक विद्यार्थ्यांमधून ऊर्जा साठवणूक, सुपरकॅपेसिटर, इलेक्ट्रोकॅटलिसिस आणि हरित हायड्रोजन निर्मित क्षेत्रातील उत्कृष्ट संशोधन कार्याच्या आधारे या विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली. या विद्यार्थ्यांनी प्रगत नॅनोमटेरियल्स, ऊर्जा साठवणूक प्रणाली आणि शाश्वत ऊर्जा तंत्रज्ञान क्षेत्रात केलेल्या संशोधनाची आंतरराष्ट्रीय स्तरावर दखल घेण्यात आली आहे.

निवड झालेले विद्यार्थी तैवानमधील नॅशनल डाँग व्हा युनिव्हर्सिटी  येथे  ‘मशीन लर्निंग एडेड सर्च फॉर सेमीकंडक्टर नॅनोमटेरिअल्स सुटेबल फॉर ग्रीन हैड्रोजन जनरेशन’ या संशोधन कार्यशाळेत सहभाग घेणार आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंगच्या साहाय्याने हरित हायड्रोजन निर्मितीसाठी उपयुक्त सेमिकंडक्टर नॅनोमटेरियल्सचा शोध घेणे हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. 

या कार्यक्रमांतर्गत विद्यार्थ्यांना नॅशनल डाँग व्हा विद्यापीठामार्फत संशोधनासाठी आर्थिक सहाय्य व आंतरराष्ट्रीय संशोधन सुविधांसाठी तीन महिन्यांची संशोधन शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली आहे. या कालावधीत विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाच्या संशोधन प्रयोगशाळांमध्ये कार्य करण्याची, अत्याधुनिक उपकरणांवर संशोधन करण्याची तसेच आंतरराष्ट्रीय संशोधकांसोबत काम करण्याची संधी मिळणार आहे. आंतरराष्ट्रीय कार्यशाळेतील या सहभागासाठी कुलपती डॉ. संजय डी. पाटील यांनी विद्यार्थ्याना आर्थिक पाठबळ प्रदान केले आहे.

या विद्यार्थ्यांना संशोधन संचालक प्रा. डॉ. पी. एस. पाटील, अधिष्ठाता प्रा. डॉ. सी. डी. लोखंडे तसेच संशोधन मार्गदर्शक प्रा. डॉ. यु. एम. पाटील आणि डॉ. एस. बी. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.

निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे विद्यापीठाचे कुलपती डॉ. संजय डी. पाटील, संस्थेचे उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कुलगुरू डॉ.  राकेश कुमार शर्मा, कुलसचिव डॉ. व्ही. व्ही. भोसले यांनी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes