SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहितीदुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्राचे विशेष पॅकेज द्या; खासदार धनंजय महाडिक यांची अमित शहा यांच्याकडे मागणी१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मानराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या 'केआयटी'चा डंका; आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार पटकावलेविद्यापीठाचे सुरक्षा रक्षक शिवाजी शिंदे यांना शोल्डर स्टारमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादनशिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरगोकुळ अध्यक्ष निवड वाद: चंद्रकांतदादांच्या समर्थनार्थ भाजपा-महायुती आक्रमक; विरोधकांचा पत्रकार परिषदेतून जोरदार समाचार

जाहिरात

 

विद्यापीठाचे सुरक्षा रक्षक शिवाजी शिंदे यांना शोल्डर स्टार

schedule14 Nov 26 person by visibility 128 categoryसामाजिक

कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठातील सुरक्षा कर्मचारी शिवाजी विठ्ठल शिंदे यांच्या गणवेशावर शोल्डर स्टार लावण्याचा समारंभ काल विद्यापीठात कुलगुरू डॉ. राजनीश कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. ज्योती जाधव यांच्या हस्ते संपन्न झाला.

शिवाजी विद्यापीठातील कायम सेवेतील वरिष्ठ सुरक्षा कर्मचारी शिवाजी विठ्ठल शिंदे यांना कुलगुरू डॉ. कामत यांनी गणवेशावर एक शोल्डर स्टार लावून काम करण्यास अनुमती दिली आहे. त्यानुसार सुरक्षा अधिकारी वसंत एकले यांनी  शिंदे यांना सादर केल्यानंतर त्यांच्या गणवेशावर कुलगुरू डॉ. कामत आणि प्र-कुलगुरू डॉ. जाधव यांच्या हस्ते स्टार लावण्याचा समारंभ व्यवस्थापन परिषद सभागृहात पार पडला.

 यावेळी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, व्यवस्थापन परिषदेचे राज्यपाल नियुक्त सदस्य सिद्धार्थ शिंदे यांच्यासह सदस्य डॉ बबन सातपुते, डॉ राजेश निमट, अमरसिंग राजपूत, उपकुलसचिव डॉ. उत्तम सकट उपस्थित होते.

शिवाजी शिंदे यांनी भारतीय सैन्य दलात १८ वर्षे सेवा बजावली असून नाईक पदावरुन निवृत्त झाले आहेत. त्याचप्रमाणे शिवाजी विद्यापीठाच्या सुरक्षा विभागात त्यांनी २३ वर्षांहून अधिक काळ सेवा बजावली आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes