SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शिवाजी विद्यापीठाच्या ६४व्या वर्धापनदिनानिमित्त ‘दिलखुलास’मध्ये कुलगुरु डॉ. कामत यांची विशेष मुलाखतपंडित नेहरू यांना विद्यापीठात अभिवादन'गोकुळ' दूध दरात लवकरच वाढ होणार? बुधवार-गुरुवारपर्यंत निर्णय शक्यता; नवे अध्यक्ष राजेश पाटील यांची माहितीदुष्काळग्रस्त शेतकरी आणि साखर कारखान्यांना केंद्राचे विशेष पॅकेज द्या; खासदार धनंजय महाडिक यांची अमित शहा यांच्याकडे मागणी१६ वर्षांचा संघर्ष मिटला; धनगर समाजाच्या एकीबद्दल आमदार यड्रावकर यांच्याकडून सन्मानराष्ट्रीय पातळीवर कोल्हापूरच्या 'केआयटी'चा डंका; आयएसटीईचे दोन मानाचे पुरस्कार पटकावलेविद्यापीठाचे सुरक्षा रक्षक शिवाजी शिंदे यांना शोल्डर स्टारमाजी पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांना राज्यपालांचे अभिवादनशिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकरगोकुळ अध्यक्ष निवड वाद: चंद्रकांतदादांच्या समर्थनार्थ भाजपा-महायुती आक्रमक; विरोधकांचा पत्रकार परिषदेतून जोरदार समाचार

जाहिरात

 

शिरोळ तालुक्यातील रस्ते विकासाला प्राधान्य : आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर

schedule14 Nov 26 person by visibility 160 categoryराज्य

◼️एक कोटींच्या निधीतून उदगाव ते दत्त साखर कारखाना रस्ता सुधारणे कामाचा शुभारंभ

उदगाव : शिरोळ तालुक्यातील रस्ते मजबुतीकरण करून दळणवळण व्यवस्था अधिक अद्ययावत करण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. सांगली जिल्ह्यात जाणाऱ्या आणि तेथून शिरोळ तालुक्यात येणाऱ्या वाहनधारकांची मोठी संख्या लक्षात घेता उदगाव ते दत्त साखर कारखाना या रस्त्याचे मजबुतीकरण होणे आवश्यक होते. त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर केला असून, तालुक्यातील रस्ते विकासाला यापुढेही प्राधान्य देणार असल्याचे प्रतिपादन आमदार व माजी आरोग्य राज्यमंत्री डॉ. राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी केले.

आमदार यड्रावकर यांच्या विशेष प्रयत्नातून ३०५४ इतर जिल्हा मार्ग रस्ते विकास व मजबुतीकरण या योजनेंतर्गत एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. या निधीतून उदगाव ते दत्त साखर कारखाना रस्ता सुधारणेच्या कामाचा शुभारंभ तसेच २० लाख रूपयांच्या कल्लेश्वर मंदिर सांस्कृतिक हॉल स्लबचा शुभारंभ आमदार राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्या हस्ते करण्यात आला.

यावेळी बोलताना आमदार यड्रावकर म्हणाले की, शिरोळ तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची सुधारणा करून नागरिकांचा प्रवास सुरक्षित आणि सुलभ करण्यासाठी विविध योजनांच्या माध्यमातून निधी उपलब्ध करून दिला जात आहे. उदगाव ते दत्त साखर कारखाना हा सांगली जिल्हा आणि शिरोळ तालुक्याला जोडणारा महत्त्वाचा मार्ग आहे. या रस्त्यावरून दोन्ही जिल्ह्यांतील वाहनांची मोठ्या प्रमाणात ये-जा सुरू असते. त्यामुळे या मार्गाच्या सुधारणेची आवश्यकता लक्षात घेऊन निधी मंजूर करण्यात आला आहे.
तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी पायाभूत सुविधांची कामे सातत्याने मार्गी लावण्याचा आपला प्रयत्न असल्याचेही त्यांनी सांगितले. उदगावच्या विकासासाठी यापुढेही निधी कमी पडू दिला जाणार नसल्याची ग्वाही त्यांनी यावेळी बोलताना दिली. 

याप्रसंगी जिल्हा परिषद सदस्य अमोल चव्हाण, पंचायत समिती सदस्या दीप्ती जाधव, राजेंद्र मगदूम, बाचू बंडगर, कुबेर मगदूम, सुरगोंड पाटील, सलीम मोळे, संतोष बिडवे, अजित कोरे, रावसाहेब मडिवाळ, श्रीकांत कोरे, अशोक मगदूम, रावसाहेब मगदूम, सचिन पाटील, विठ्ठल पाटील यांच्यासह पदाधिकारी व गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes