संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड
schedule19 Jul 26 person by visibility 266 categoryराजकीय
कोल्हापूर : काँग्रेसच्या जिल्हा प्रवक्ता म्हणून संपत मधुकर पाटील व माजी नगरसेवक ॲड अमोल माने यांची निवड करण्यात आली.
संघटन सुजन अभियाना अंतर्गत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या निरीक्षकांनी जिल्ह्यात भेटी देऊन जिल्ह्यातील काँग्रेस नेते पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केली हाेती.
त्यानुसार ब्लॉक अध्यक्ष नियुक्ती संदर्भात प्रदेश कार्यालयाकडे दिलेल्या शिफारशी विचारात घेत प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ, काँग्रेसचे विधानपरिषदेतील गटनेते आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संजय यशवंत पटकारे, राजदीप माधवराव भोसले, उत्तम वसंतराव शेटके यांची ब्लॉक अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर संपत पाटील, अमोल माने यांची काँग्रेस प्रवक्तेपदी निवड करण्यात आली.