SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकरवीज दरवाढीतून महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा : सतेज पाटील यांचा आरोप : प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणीवेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात 20 फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश लागूपरीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जाहिरात

 

कोल्हापूरच्या महापौरपदी रुपाराणी निकम तर उपमहापौरपदी अक्षय जरग यांची निवड

schedule06 Feb 26 person by visibility 276 categoryमहानगरपालिका

कोल्हापूर : कोल्हापूर महानगरपालिकेच्या 51 व्या महापौरपदी नगरसेविका रुपाराणी संग्रामसिंह निकम यांची तर 46 व्या उपमहापौरपदी नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांची आज निवड झाली. पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे हे हया बैठकीच्या अध्यक्षस्थानी होते.

महापौरपदासाठी नगरसेविका रुपाराणी निकम व सचिन शेंडे यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी सदरच्या अर्जांची छाननी करुन दोंन्ही अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.

यानंतर महापौरपदासाठी दोन उमेदवार राहिलेने हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये रुपाराणी निकम यांना 46 मते तर सचिन शेंडे यांना 35 मते पडली. रुपाराणी निकम यांना सर्वाधिक 46 मते पडल्याने त्यांची महापौरपदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. नूतन महापौर रुपाराणी संग्रामसिंह निकम हया प्रभाग क्र.18 क या मतदार संघातून नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.

उपमहापौर पदासाठी नगरसेवक अक्षय विक्रम जरग व दुर्वास कदम यांचे अर्ज दाखल झाले होते. प्रारंभी पिठासन अधिकारी यांनी सदरच्या अर्जांची छाननी करुन दोन्हीं अर्ज वैध असल्याचे जाहिर केले. त्यानंतर माघारीसाठी 15 मिनिटे वेळ देण्यात आली. यामध्ये कोणीही अर्ज मागे घेतला नाही.

यानंतर उपमहापौर पदासाठी हात वर करुन मतदान घेण्यात आले. यामध्ये नगरसेवक अक्षय जरग यांना 46 मते तर दुर्वास कदम यांना 35 मते पडली. नगरसेवक अक्षय विक्रम जरग यांना सर्वाधिक 46 मते पडल्याने त्यांची उपमहापौर पदी निवड झाल्याचे पिठासन अधिकारी यांनी घोषित केले. नुतन उपमहापौर अक्षय विक्रम जरग हे प्रभाग क्र.10 ड या मतदार संघातून नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.

ही निवडणूक प्रक्रिया मुख्य लेखापाल संजय सरनाईक, कामगार अधिकारी राम काटकर, पशु वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय पाटील, घरफाळा अधिक्षक अशोक यादव यांनी पिठासन अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली राबविली.

यावेळी पिठासन अधिकारी तथा जिल्हाधिकारी अमोल येडगे, आयुक्त के.मंजूलक्ष्मी, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, नगरसचिव सुनिल बिद्रे, अधिकारी, नगरसेवक/ नगरसेविका यांनी नुतन महापौर व उपमहापौरांचे पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes