SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विशेष मतदारयादी पुनरिक्षण कार्यक्रम जाहीरघरफोडी करणारा आरोपी जेरबंद, 14 घरफोडीचे गुन्हे उघडकीसउत्पन्न वाढीसाठी एसटी बसेस फेऱ्यांचा वक्तशीरपणा वाढवा : परिवहन मंत्री प्रताप सरनाईकउपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वाढदिवस साजरा करणार नाहीतजिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभाडिजिटल आशय, मनोरंजन क्षेत्रात सर्वाधिक संधी : डॉ. मारुलकरवीज दरवाढीतून महावितरणचा जनतेच्या खिशावर दरोडा : सतेज पाटील यांचा आरोप : प्रस्तावित वीज दरवाढीवर सुनावणीवेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटीलकोल्हापूर जिल्ह्यात 20 फेब्रुवारीपर्यंत बंदी आदेश लागूपरीक्षा केंद्रांच्या परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

जाहिरात

 

जिल्हा नियोजन समितीची येत्या बुधवारी सभा

schedule06 Feb 26 person by visibility 115 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्हा नियोजन समितीची सभा बुधवार, दिनांक 11 फेब्रुवारी रोजी दुपारी 1 वाजता ताराराणी सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. बैठकीस नगरविकास, परिवहन, सामाजिक न्याय, वैद्यकीय शिक्षण व अल्पसंख्याक विकास राज्यमंत्री तथा सह-पालकमंत्री माधुरी मिसाळ उपस्थित राहणार आहेत.

या बैठकीत 23 जून 2025 रोजी आयोजित जिल्हा नियोजन समिती बैठकीच्या इतिवृत्तास व इतिवृत्तावरील कार्यपूर्ती अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2025-26 अंतर्गत दि. 7 फेब्रुवारी 2026 अखेरील खर्चाचा आढावा, जिल्हा वार्षिक योजना 2025-26 मधील पुनर्विनियोजनास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2026-27 प्रारुप आराखड्यास मान्यता देणे व आयत्या वेळचे विषय होणार आहेत, 

अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सचिव अमोल येडगे यांनी दिली.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes