वेणूताई चव्हाण यांच्या कार्यात परिवर्तनाची स्पष्ट दिशा: डॉ. भारती पाटील
schedule06 Feb 26 person by visibility 113 categoryशैक्षणिक
कोल्हापूर: वेणूताई चव्हाण यांच्या कार्यात केवळ सेवा नव्हे, तर परिवर्तनाची स्पष्ट दिशा होती, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत डॉ. भारती पाटील यांनी केले.
संयुक्त महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या पत्नी वेणूताई चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण अध्यासनाच्या वतीने वेणूताई चव्हाण यांच्या कार्याची ओळख करून देण्यासाठी डॉ. पाटील यांचे काल विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. नितीन माळी होते.
डॉ. भारती पाटील यांनी वेणूताई चव्हाण यांच्या जीवनकार्यावर प्रकाशझोत टाकला. त्या म्हणाल्या, वेणूताई चव्हाण यांच्याकडे केवळ यशवंतराव चव्हाण यांची सावली म्हणून पाहिले जाते. तथापि, त्यांचे स्वतःचे म्हणून असे एक स्वतंत्र व्यक्तीमत्त्व होते. त्यांचा संघर्ष, धैर्य आणि सामाजिक योगदानाप्रती त्यांच्या मनात असलेल्या जाणीवा या सर्वच बाबी त्यांचे वेगळेपण दाखविणाऱ्या होत्या. वेणूताई चव्हाण यांनी आपल्या कार्यातून स्त्रीला स्वावलंबी, आत्मविश्वासी आणि विचारक्षम बनवण्याचा ध्यास घेतला होता. सामाजिक सेवेपलिकडे एक परिवर्तनाची स्पष्ट दिशा त्यांच्या समग्र कार्याला लाभलेली होती. आजच्या पिढीने वेणूताईंच्या व्यक्तीमत्त्वाचे हे पैलू लक्षात घेऊन त्यांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता आहे.
अध्यक्षीय मनोगतात डॉ. नितीन माळी म्हणाले, वेणूताई चव्हाण यांनी ज्या तन्मयतेने यशवंतराव चव्हाण यांना अखंड साथसोबत केली, तिला तोड नाही. आजच्या पिढीसाठी ते अत्यंत आदर्शवत आणि प्रेरणादायी आहे.
यावेळी डॉ. गजानन साळुंखे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. डॉ. प्रताप खोत यांनी सूत्रसंचालन केले. कार्यक्रमाला डॉ. उमेश गडेकर, चेतन गळगे, डॉ. संतोष सुतार, मृणालिनी जगताप, डॉ. उर्मिला दशवंत यांच्यासह विद्यार्थी विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.