SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शनिवारी कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट बंद ठेवुन 'अर्थ अवर'कोल्हापूर : घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलतकोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंधनिरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गतीकोल्हापूर महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगाहॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांचा गॅस पुरवठा पुर्ववत चालू करा; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणीकोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाचा २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा; व्यवसायातील आव्हानांवर होणार 'मंथन'डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2026' संपन्नकणेरी मठात रंगणार १७ राज्यांतील कलाकारांचा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'; ३१ मार्चपासून महासोहळ्याला सुरुवात

जाहिरात

 

हॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांचा गॅस पुरवठा पुर्ववत चालू करा; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणी

schedule25 Mar 26 person by visibility 119 categoryराज्य

कोल्हापूर : गॅस च्या तुटवड्यामुळे हॉटेल व कॅटरिंग व्यवसायाला मोठा फटका बसत असल्याने गॅसचा पुरवठा पुर्ववत होणेसाठी प्रयत्न करावेत याबाबतचे निवेदन कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज, कोल्हापूर कॅटरर्स वेलफेअर असोसिएशन व कोल्हापूर हॉटेल मालक संघाच्या वतीने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांना देण्यात आले.

 

 यावेळी कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे म्हणाले, गेले ८ ते १० दिवस कोल्हापूरातील व्यावसायिक गॅस पुरवठा पूर्णत: बंद आहे. महाराष्ट्र शासनाने गॅस पुरवठ्याबाबत काढलेल्या अध्यादेशानुसार २० ते ३० टक्के पुरवठा व केंद्र शासनाच्या अध्यादेशानुसार ५० टक्के पुरवठा करणे बंधनकारक आहे. पण त्या अध्यादेशाची अंमलबजावणी होताना दिसत नाही. हॉटेल व कॅटरिंग व्यवसायाला गॅस कधी मिळेल याची शाश्वती नसल्याने तो व्यवसायच सध्या ‘गॅस’ वर असल्याचे सांगितले. जिल्हा पुरवठा अधिकारी गॅसचा पुरेसा साठा असल्याचे सांगतात. पण त्याप्रमाणे हॉटेल व कॅटरिंग व्यवसालायाला गॅसचा पुरवठा होत नसल्याने सध्या हा व्यवसाय अडचणीत आला असल्याने त्यांना पुर्ववत गॅस पुरवठा करुन देण्याची मागणी केली.

 

हॉटेल मालक संघाचे अध्यक्ष सचिन शानबाग म्हणाले, हॉटेल व्यवसायावार अनेक कुटुंबे चालत असून त्यांचा व्यवसाय ठप्प झाल्याने हॉटेल मालकांसोबत त्यांच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबावर उपासमारीची वेळ आली आहे. हॉटेल बंद मुळे कामगार वर्ग गावी गेल्यास तो पुन्हा कामावर येण्याची शाश्वती नाही. हॉटेल व्यावसायिक वेगवेगळ्या रुपाने कर भरुन शासनाच्या उत्पन्नात मोठा हातभार लावत असतो. पण सध्या हा व्यवसाय मोठ्या संकटातून चालला आहे. त्याला सावरण्याची गरज असल्याचे त्यांनी नमूद केले.

चेंबरचे मानद सचिव अजित कोठारी म्हणाले, सध्याच्या घडीला हॉटेल मध्ये ठरावीकच खाद्यपदार्थ मिळतात. त्यामुळे पर्यटकांचा पाहुणचार करणे जिकीरीचे होत असून कोल्हापूरात पर्यटन वाढीस यामुळे आळा बसण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसाय वाचण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज असल्याचे सांगितले.

 

कॅटरर्स वेलफेअर असोसिएशनचे अध्यक्ष विवेक शिंदे म्हणाले, काही कॅटरिंग व्यावसायिकांनी कॅटरिंगची अगोदरच ऑर्डर घेतली असून गॅसच्या तुडवड्यामुळे ऑर्डर रद्द करण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. 

 

यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी व्यावसायिक गॅसचा तुटवडा कोल्हापूर बरोबर इतर शहरातही होत असून याबाबत तोडगा काढणेसाठी वरिष्ठ स्तरावर प्रयत्न करु असे सांगितले. येत्या ४ दिवसांत हा प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन त्यांनी शिष्टमंडळाला दिले.

 

यावेळी कोल्हापूर हॉटेल मालक संघाचे सुशांत पै, सिद्धार्थ लाटकर, मनोज पुरोहित, संदीप सूर्यवंशी, अरुण चोपदार,  कोल्हापूर कॅटरर्स वेल्फेअर असोसिएशनचे उदय भोसले, चंद्रमोहन गिरी, रमेश पुरोहित, महावीर सन्नके, ओंकार शुक्ल, रोहन दुधाने, गणेश काटे, रोहन काटे उपस्थित होते.

 

🟠 तर हॉटेल व्यवसाय बंद पडेल : संजय शेटे

सध्या कोल्हापूर शहर व जिल्हयातील २५ ते ३० टक्के हॉटेल गॅस पुरवठ्याअभावी बंद आहेत. येत्या ४ दिवसांत यावर तोडगा निघाला नाही तर उर्वरित हॉटेल देखील बंद होण्याची भीती असल्याचे संजय शेटे यांनी सांगितले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes