SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
शनिवारी कोल्हापूर शहरातील सर्व स्ट्रीट लाईट बंद ठेवुन 'अर्थ अवर'कोल्हापूर : घरफाळा दंडामध्ये व पाणी बिलातील विलंब आकारामध्ये 26 ते 31 मार्च अखेर 80 टक्के सवलतकोल्हापूर जिल्ह्यात अफवांमुळे पेट्रोल पंपांवर मागणी व पुरवठा यामध्ये असमतोल निर्माण झाल्याने आपत्ती व्यवस्थापन अंतर्गत प्रशासनाकडून आवश्यक निर्बंधनिरोगी, सक्षम व बुद्धिमान पिढीसाठी स्तनपान काळाची गरज : जिल्हाधिकारी अमोल येडगेकोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गतीकोल्हापूर महापालिका व जलसंपदा वसूलीबाबत सकारात्मक तोडगाहॉटेल व कॅटरिंग व्यावसायिकांचा गॅस पुरवठा पुर्ववत चालू करा; कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीजची जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे मागणीकोल्हापूर जिल्हा सराफ सुवर्णकार संघाचा २८ मार्च रोजी जिल्हास्तरीय मेळावा; व्यवसायातील आव्हानांवर होणार 'मंथन'डॉ. बापूजी साळुंखे इंजिनिअरिंग इन्स्टिट्यूटमध्ये राष्ट्रीय स्तरावरील तांत्रिक स्पर्धा 'इंपल्स 2026' संपन्नकणेरी मठात रंगणार १७ राज्यांतील कलाकारांचा 'सिद्धगिरी कारागीर महाकुंभ'; ३१ मार्चपासून महासोहळ्याला सुरुवात

जाहिरात

 

कोल्हापूर विमानतळ विकासासाठी ५० कोटी : पालकमंत्री आबिटकर; विस्तारीकरणाच्या कामास मिळणार गती

schedule25 Mar 26 person by visibility 176 categoryराज्य

कोल्हापूर : कोल्हापूर विमानतळाच्या विकासासाठी राज्य शासनाने ५० कोटींचा निधी मंजूर केला असून या निधीमुळे विमानतळ विस्तारीकरणाच्या कामांना गती मिळणार असल्याची माहिती पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिली. मंजूर निधीतून कोल्हापूर-हुपरी मार्गावरील वळतीकरण, रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. त्यानंतर विमानतळ विस्तारीकरणाचा मार्ग मोकळा होणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

विमानतळावरील सध्याची १३७० मीटर धावपट्टी वाढवून ती २३०० मीटरपर्यंत करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या विस्तारीकरणासाठी अतिरिक्त ६७ एकर जमिनीची गरज होती. जिल्हा प्रशासनाने जवळपास तीन वर्षे प्रक्रिया राबवून ही जमीन संपादित केली. यापूर्वी ताब्यात दिलेल्या जमिनीबरोबरच उर्वरित ६७ एकर जमीन २० जानेवारी २०२५ रोजी भारतीय विमानतळ प्राधिकरणच्या ताब्यात देण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, विस्तारित क्षेत्रातून जाणाऱ्या कोल्हापूर-हुपरी रस्त्याचा प्रश्न सुटल्याशिवाय जमीन ताब्यात घेण्यास प्राधिकरणाने नकार दिला होता. आता त्यासाठी निधी मंजूर झाला असून या रस्त्याचा प्रश्न सुटण्यास मदत होणार आहे. 

धावपट्टी २३०० मीटरपर्यंत वाढल्यानंतर मोठ्या आकाराची विमाने कोल्हापूर विमानतळावर उतरू शकणार आहेत. त्यामुळे मुंबई, दिल्ली, बंगळुरू, हैदराबाद यांसारख्या प्रमुख शहरांसोबतच राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या शक्यताही निर्माण होणार आहेत.

राज्यातील विमानतळांच्या विकासासाठी शासनाने सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केली आहे. त्याअंतर्गत राज्य शासनाने विविध विमानतळांच्या विकासासाठी १६९ कोटी २१ लाख ५४ हजार ८०० रुपयांचा निधी वितरीत करण्यास मंजुरी दिली असून यामध्ये कोल्हापूर विमानतळासाठी ५० कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

कोल्हापूर विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी कोल्हापूर-हुपरी रस्त्याचे वळतीकरण करणे आवश्यक आहे. या कामासाठी भूसंपादन, नवीन रस्ता बांधकाम तसेच महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीचा अस्थापना खर्च या सर्व बाबींसाठी मंजूर निधीचा वापर करण्यात येणार आहे. या कामांमुळे विमानतळ विस्तारासाठी आवश्यक जमीन उपलब्ध होणार असून भविष्यात मोठ्या विमानांची सेवा सुरू करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण होणार आहेत.
कोल्हापूरसह पन्हाळा, राधानगरी, गगनबावडा, आजरा, चंदगड तसेच दक्षिण महाराष्ट्रातील पर्यटनस्थळांना अधिक पर्यटक आकर्षित होण्यास मदत होणार आहे. दरम्यान, शासनाने मंजूर केलेला निधी ३१ मार्च २०२६ पूर्वी संबंधित विकासकामांसाठी खर्च करण्याचे निर्देश देण्यात आले असून खर्चाबाबत उपयोगिता प्रमाणपत्र शासनास सादर करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes