कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंद
schedule10 Jul 26 person by visibility 131 categoryमहानगरपालिका
कोल्हापूर : कसबा बावडा येथील संप हाऊसची व बी.पी.टी टँकची गळती काढण्याचे काम सोमवार, दि.13 जुलै 2026 रोजी हाती घेण्यात येणार आहे. त्यामुळे शहरातील ई वॉर्ड भागातील कावळा नाका वितरण शाखेअंतर्गत पाणी पुरवठा होणा-या भागातील नळ कनेक्शन धारकांना दैनंदिन पाणी पुरवठा होवू शकणार नाही. तसेच मंगळवार दि.14 जुलै 2026 रोजी होणारा पाणी पुरवठा हा एक दिवस आड नियोजनाप्रमाणे अपुरा व कमी दाबाने होईल. रविवार दिनांक 12 जुलै 2026 रोजी कावळा नाका वितरण शाखेअंतर्गत येणा-या सर्व भागातील नागरिकांना एक आड एक दिवस पाणी पुरवठा न होता संपूर्ण भागास पाणी पुरवठा होणार आहे.
कावळा नाका वितरण अंतर्गत असणा-या भगवा चौक, संपुर्ण बावडा, मधुमालती कॉलनी, डी.वाय.पाटील रोड, बिरंजे पाणंद, कदमवाडी, चौगले गल्ली, उलपे मळा, कनाननगर, पोवार मळा, रमणमळा, न्यु पॅलेस, धैर्यप्रसाद, कारंडे मळा, सर्किट हाऊस, ताराबाई पार्क, लाईनबाजार, सदरबाजार, विचारे माळ, कावळा नाका, टेंबलाईवाडी, स्टेशन रोड, बापट कँप, लोणार वसाहत, रुईकर कॉलनी, रुक्मीणी नगर, मार्केट यार्ड, लिशा हॉटेल, जाधववाडी, मुक्त सैनिक वसाहत, बाबर हॉस्पीटल, शिवाजी पार्क या भागात पाणी पुरवठा होऊ शकत नाही.
तरी संबधीत भागातील नागरीकांनी उपलब्ध होणारे पाणी काटकसरीने वापरून व अपव्यय टाळून कोल्हापूर महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाच्यावतीने करण्यात आले आहे.