SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
सरकारला आरसा दाखवणे म्हणजे 'महाराष्ट्रद्रोह' नव्हे; सतेज पाटलांचा सरकारवर घणाघाती हल्ला!योग्य आहार, व्यायाम व झोप ही सुदृढ आरोग्याची त्रिसुत्री : ‘लॉरस लॅब’ चे संस्थापक डॉ. सत्यनारायण चावा यांचे प्रतिपादन; डी वाय पाटील अभिमत विद्यापीठात मार्गदर्शन कसबा बावडा पंप हाऊस येथील दुरुस्ती मुळे ई वॉर्डचा १३ जुलैला पाणीपुरवठा बंदशहराच्या विकासासाठी सर्वांनी एकत्रितपणे काम करावे : महापौर रूपाराणी निकमराजूर ग्रामीण रुग्णालयाचे 100 खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयात श्रेणीवर्धन सुधारित प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न : आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकरमहात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेतील गैरव्यवहार प्रकरणी विशेष तपास पथक स्थापन करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसकेआयटीचा प्लेसमेंटमध्ये नवा इतिहास ! १५७ कंपन्यांकडून ६५२ विद्यार्थ्यांची विक्रमी निवड; सर्वोच्च पॅकेज ₹२७.५० लाखकोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठामातृ सुरक्षा दिन: मातृत्व जपण्याचा संकल्प'क्लायमेट सत्याग्रह' जनतेच्या माध्यतातून पुढे जाणे आवश्यक - प्रा.चेतन सिंह सोलंकी

जाहिरात

 

कोल्हापूर जिल्ह्यातील 38 बंधारे पाण्याखाली; राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा

schedule10 Jul 26 person by visibility 122 categoryराज्य

कोल्हापूर : जिल्ह्यातील राधानगरी धरणात 5.07 टीएमसी पाणीसाठा आहे. आज सकाळी 7 च्या अहवालानुसार राधानगरी धरणातून  पाण्याचा विसर्ग निरंक आहे.

पंचगंगा नदीवरील- शिंगणापूर, राजाराम, सुर्वे, रुई, इचलकरंजी, तेरवाड व शिरोळ, भोगावती नदीवरील- सरकारी कोगे, हळदी, खडक कोगे व राशिवडे,  तुळशी नदीवरील- कसबा बीड,  कासारी नदीवरील- यवलूज, ठाणे आळवे, पुनाळ तिरपण, बाजार भोगांव, वालोली व पेंडाखळे, कुंभी नदीवरील- सांगरुळ, वारणा नदीवरील- कोडोली, मांगलेसावर्डे, खोची, शिगाव, चावरे व दानोळी, दूधगंगा नदीवरील- सिध्दनेर्ली, दत्तवाड, सुळकूड व बाचणी, वेंदगंगा नदीवरील- कुरणी, बस्तवडे, चिखली, निळपण, वाघापुर व सुरुपली, ताम्रपर्णी नदीवरील -चंदगड, कोतेवाडी व कोकरे असे एकूण 38 बंधारे पाण्याखाली आहेत.

आपल्या जिल्ह्यातील धरणांमध्ये पुढीलप्रमाणे पाणीसाठा आहे. राधानगरी 5.07 टीएमसी, तुळशी 1.93 टीएमसी, वारणा 20.18 टीएमसी, दूधगंगा 7.54 टीएमसी, कासारी 1.54 टीएमसी, कडवी 1.39 टीएमसी, कुंभी 1.36 टीएमसी, पाटगाव 1.75 टीएमसी, चिकोत्रा 0.60 टीएमसी, चित्री 1.04 टीएमसी, जंगमहट्टी 0.79 टीएमसी, घटप्रभा 1.56 टीएमसी, जांबरे 0.82 टीएमसी, आंबेआहोळ 0.92 टीएमसी, सर्फनाला 0.58 टीएमसी, धामणी 1.29 व कोदे ल.पा. 0.21 टीएमसी इतका पाणीसाठा आहे.

तसेच बंधाऱ्यांची पाणी पातळी पुढीलप्रमाणे आहे. राजाराम 35.4 फूट, सुर्वे 35फूट, रुई 65.9 फूट, इचलकरंजी 62.3 फूट, तेरवाड 57 फूट, शिरोळ 53 फूट, नृसिंहवाडी 51.6 फूट, राजापूर 41 फूट तर नजीकच्या सांगली  24.6 फूट व अंकली 30.3 फूट अशी आहे.

⚫ जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 1.1 मिमी पावसाची नोंद; गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9 मिमी पाऊसाची नोंद
कोल्हापूर जिल्ह्यात मागील 24 तासात गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक 9 मिमी पाऊस पडल्याची नोंद झाली आहे.

जिल्ह्यात 24 तासात पडलेला एकूण पाऊस मिमी मध्ये पुढीलप्रमाणे - हातकणंगले- 0.3 मिमी, शिरोळ -0.1 मिमी, पन्हाळा- 0.4 मिमी, शाहुवाडी- 0.9 मिमी, राधानगरी- 0.5 मिमी, गगनबावडा- 9 मिमी, करवीर- 0.3 मिमी, कागल- 0.2 मिमी, गडहिंग्लज- 0.3 मिमी, भुदरगड- 0.2 मिमी, आजरा- 0.7 मिमी, चंदगड- 0.3 मिमी, असा एकूण 1.1 मिमी पाऊस पडल्याची नोंद आहे.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes