रामनवमी : अयोध्येत रामलल्लाचा सूर्यतिलक, भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी दाखल
schedule06 Apr 25 person by visibility 536 categoryदेश
आयोध्या: देशभरात रामनवमीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे. रामनवमीनिमित्त मंदिरांमध्ये विशेष पूजा आणि आरत्या केल्या जात आहेत. सकाळपासूनच देशभरातील मंदिरांमध्ये दर्शनासाठी भक्तांची गर्दी आहे. भगवान रामाचे जन्मस्थान असलेल्या अयोध्येत, रामनवमीनिमित्त भाविकांचा महापूर आला आहे. आज राम मंदिरात भगवान रामाचा सूर्यतिळक झाला.
रामनवमीनिमित्त उत्तर प्रदेशातील ४२ जिल्ह्यांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे, आज विविध ठिकाणी मिरवणुका काढल्या जातील. अनेक ठिकाणी काही अटींसह मिरवणुका काढण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्याचबरोबर पंतप्रधान मोदींनी देशवासियांना राम नवमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
अयोध्येत ड्रोन वापरून भाविकांवर शरयूचे पाणी फवारले जात आहे. तसेच भगवान राम मंदिर आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली आहे. भाविक मोठ्या संख्येने दर्शनासाठी येत असून भक्ती पूर्ण वातावरणामध्ये राम नवमी साजरी होत आहे.