SMP News Network
SOCIAL MEDIA POWER
Register
Breaking : bolt
९० दिवसांचा अल्टिमेटम अन् थेट मुंबईत धडकण्याचा इशारा; जरांगे पाटलांचे उपोषण सुटले, पण लढा सुरूच!सेवा संकल्पातून लोकाभिमुख प्रशासन महिनाभराचा उपक्रम ; प्रशासन जनतेच्या दारीमराठवाडा मुक्ती संग्राम : स्वातंत्र्य, लोकशक्ती आणि राष्ट्रीय एकात्मतेचा गौरवशाली अध्यायजागतिक रुग्ण सुरक्षा दिन: सुरक्षित वैद्यकीय सेवा आणि आपली जबाबदारीगोकुळ निवडणुक: दुसऱ्या दिवशी माजी अध्यक्ष विश्वास पाटील यांच्यासह १२ उमेदवारांचे अर्ज दाखललोकोपयोगी कामे करुन सेवा संकल्प अभियान यशस्वी करा : जिल्हाधिकारी डॉ. विजय राठोडगणेश उत्सवाच्या पार्श्वभूमीवर ड्रोन उड्डाण व चित्रीकरणास प्रतिबंधआरोग्य विभागाच्या ताफ्यात दोन जेसीबीची भर; नवीन जेसीबी थ्रीडी एक्स बॅकहो लोडरचे लोकार्पणविज्ञानाकडे प्रयोगशील आणि चिकित्सक दृष्टिकोनातून पाहा: डॉ. आर. के. शर्माडी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश

जाहिरात

 

डी. वाय. पाटील अभियांत्रिकीच्या राधिकाचे विभागीय बुद्धिबळ स्पर्धेत सुवर्णयश

schedule16 Sep 26 person by visibility 248 categoryक्रीडा

कोल्हापूर : डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयच्या इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन अभियांत्रिकी विभागातील अंतिम वर्षाची विद्यार्थिनी कु. राधिका क्षत्रिय  हिने शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे आयोजित केलेल्या विभागीय बुद्धिबळ स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पटकावत सुवर्णपदक पटकविले.

या प्रतिष्ठित स्पर्धेत विविध जिल्ह्यातील नामांकित व अनुभवी खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. अत्यंत चुरशीच्या सामन्यांमध्ये राधिकाने सातत्यपूर्ण सराव,आत्मविश्वास आणि बौद्धिक कौशल्याच्या जोरावर आपले वर्चस्व सिद्ध करत विजेतेपदाला गवसणी घातली.

राधिकाच्या या देदीप्यमान यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील, उपाध्यक्ष आमदार सतेज डी. पाटील, विश्वस्त माजी आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील, कार्यकारी संचालक डॉ. अनिलकुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संजय पवार, डीन (आर अँड डी) डॉ. संतोष चेडे, रजिस्ट्रार डॉ. लितेश मालदे, डीन  स्टुडंट  अफेअर्स डॉ.राहुल पाटील, प्रा.नीलिमा व्हटकर, विभागप्रमुख डॉ. मनिषा भानुसे यानी अभिनंदन केले.

जाहिरात

 
Copyright © 2026. All Rights Reserved by SMP News Network.
Designed & Developed by Adhvik go Online
JSON Output

    
Settings
Theme
themes